Karad : भाजपमध्ये फक्त एकच बाबा; इतर कोणत्याही 'बाबा'ला प्रवेश नाही...

श्री. बावनकुळे Chandrashekhar Bawankule कराड तालुक्यातील Karad नांदगाव येथे धनगर समाजाच्या मेळाव्यात Dhangar community melava बोलत होते.
Chandrashekhar Bawankule, Atul Bhosale, Jaykumar Gore
Chandrashekhar Bawankule, Atul Bhosale, Jaykumar Goresarkarnama

कराड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे भाजपमध्ये येणार अशी चर्चा काही काळापूर्वी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात रंगली होती, असा उल्लेख भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांनी आपल्या भाषणात केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपामध्ये फक्त एकच बाबा अतुलबाबा इतर कोणत्याही 'बाबा'ला प्रवेश नाही, अशी कोपरखळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मारली.

श्री. बावनकुळे कराड तालुक्यातील नांदगाव येथे धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. सातारा दौऱ्यावर असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी कराड शहरात भोई समाजाचा मेळावा घेतला. तर नांदगाव येथे धनगर समाजाचा मेळावा झाला.

या दोन्ही मेळाव्यात कॉग्रेस विरोधात जोरदार टीका केली. नांदगाव येथील मेळाव्यात त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. बावनकुळे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करून डॉ. अतुल भोसले यांना विधानसभेत पाठवण्याच आवाहन केलं.

Chandrashekhar Bawankule, Atul Bhosale, Jaykumar Gore
Karad : राष्ट्रवादीचे कॉंग्रेसमध्ये लवकरच मोठी फाटाफुट होणार : बावनकुळे यांचे भाकित

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in