Lonand : सीओंच्या दालनात गोंधळ; कर्मचारी संघटनेने केला निषेध

अशा पद्धतीने कोणी वागणार असेल, तर कर्मचाऱ्यांकडून त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही या वेळी कर्मचारी संघटनेच्या Karmchari Sanghatna वतीने नगरपंचायत Nagarpanchyat कर्मचारी रोहित निंबाळकर Rohit Nimbalkar यांनी सांगितले.
Lonand Agitation
Lonand Agitationsarkarnama

लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात येथील एकाने जाऊन गोंधळ घालत अर्वाच्य भाषेत बोलून कार्यालयीन शिस्तीचा भंग केला. संबंधितांविरोधात गुन्हा करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांनी तक्रार अर्जाद्वारे लोणंद पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, नगरपंचायतीच्या कर्मचारी संघटनेने नगरपंचायतीसमोर एकत्र येत या घटनेचा निषेध केला आहे.

लोणंद येथील तन्वीर इजाज इनामदार यांनी आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुख्याधिकारी चेतन कोंडे यांच्या दालनात येऊन मुख्याधिकारी यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलत गोंधळ घातला. त्यावरून मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना आपण कोणताही वाद न घालता आपले लेखी स्वरूपात म्हणणे नगरपंचायतीकडे द्या, असे सांगितले.

त्यानंतरही इनामदार गोंधळ घालत होते. शासकीय कार्यालयात आशा प्रकारचे वर्तन करणे चुकीचे असल्याने तन्वीर इनामदार यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मुख्याधिकारी श्री. कोंडे यांनी लोणंद पोलिसांकडे लेखी तक्रारी अर्ज देऊन केली आहे. दरम्यान, नगरपंचायतीच्या कर्मचारी संघटनेने एकत्र येत या घटनेचा निषेध केला.

Lonand Agitation
माळेगाव नगरपंचायत जिंका पाच कोटी मिळवा; बावनकुळेंची ऑफर!

आम्ही लोकांची कामे करण्यासाठीच आहोत. मात्र, नागरिक अधिकारी व कर्मचाऱ्यांशी अशा पद्धतीने वागणार असतील तर ते न शोभणारे वर्तन आहे. कायद्याला धरून नाही. यापुढे अशा पद्धतीने कोणी वागणार असेल, तर कर्मचाऱ्यांकडून त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही या वेळी कर्मचारी संघटनेच्या वतीने नगरपंचायत कर्मचारी रोहित निंबाळकर यांनी सांगितले.

Lonand Agitation
Satara : एकनाथ शिंदेंचे आदित्य ठाकरेंना उत्तर... जनता त्यांना योग्यवेळी जागा दाखवेल...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com