Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा तापला; धैर्यशील मानेंना बेळगाव बंदीचे आदेश

Maharashtra Karnataka Border Dispute : पुन्हा एकदा महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद तापण्याची शक्यता
Dhairyashil Mane
Dhairyashil ManeSarkarnama

Maharashtra Karnataka Border Dispute : गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नावरून दोन्ही राज्यात तणाव निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा सीमावादाचा प्रश्न चर्चेत आला असून खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना बेळगावमध्ये येण्यास कर्नाटक सरकारने बंदी घातली आहे.

हुतात्मा दिनानिमित्त अभिवादनासाठी खासदार माने हे बेळगावला (Belgaum) जाणार होते. मात्र, माने यांच्या विरोधात बेळगाव जिल्हा प्रवेश बंदीचे आदेश कर्नाटक सरकारने काढले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद तापण्याची शक्यता आहे.

Dhairyashil Mane
Rajendra Zade आणि Sudhakar Adbale यांच्यात रेस, कोण मिळवणार कॉंग्रेसचे समर्थन?

कर्नाटक सरकारने एका महिन्याभरात दुसऱ्यांदा धैर्यशील माने यांना बेळगावमध्ये येण्यापासून रोखलं आहे. धैर्यशील माने हे बेळगावला आल्यास कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते, असं कर्नाटक सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

Dhairyashil Mane
Uddhav Thackrey News; भाजपला झटका, अस्लम मणियार, मदन डेमसे शिवसेनेत

दरम्यान, या आधीही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला धैर्यशील माने हे उपस्थित राहणार होते. मात्र, तेव्हा देखील त्यांना बेळगावला येण्यापासून रोखण्यात आले होते. त्यामुळे आता यावर महाराष्ट्र सरकार काय भूमीका घेणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dhairyashil Mane
Solapur Politics : मातोळीच्या गणपती दर्शनाने अभिजीत पाटलांच्या मंगळवेढ्यातील इनिंगची सुरुवात होणार का

या आधी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) हे उपस्थित होते. यावेळी दोन्ही राज्यांना शांततेचे आवाहन करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com