विधानपरिषदेच्या निकालावर पंकजा मुंडे म्हणाल्या...

पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचा उल्लेख करणे टाळले.
विधानपरिषदेच्या निकालावर पंकजा मुंडे म्हणाल्या...
Pankaja Munde News, Ahmednagar News Sarkarnama

अहमदनगर - योगा दिना निमित्त आज अहमदनगर शहरातील स्नेहालय या सामाजिक संस्थेत जाऊन भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी योगासने केली. तसेच या संस्थेतील मुले व संस्था चालकांशी चर्चा केली. या प्रसंगी उपस्थित पत्रकारांशी पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी संवाद साधत काल ( सोमवारी ) झालेलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत आपले मत व्यक्त केले. या प्रसंगी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचा उल्लेख करणे टाळले. ( On the result of the Legislative Council, Pankaja Munde said ... )

पंकजा मुंडे म्हणाल्या, "जे निवडून आले त्या सर्वांचे मी अभिनंदन करते. भाजपचे पाच, शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन व काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला आहे. त्या सर्वांचे मी अभिनंदन करते. राज्यसभेचा निकाल ज्या कलाने गेला त्यानुसार सर्वांना अपेक्षा होतीच. तसाच निकाल विधानपरिषदेचाही लागला आहे," असे त्यांनी सांगितले. (Pankaja Munde News)

Pankaja Munde News, Ahmednagar News
पंकजा मुंडे उद्या पाथर्डीत कार्यकर्त्यांची समजूत काढणार की अस्वस्थता उफाळणार?

त्या पुढे म्हणाल्या की, "संख्याबळावर केलेले काम हे समाजकारण असते. संख्याबळ नसताना केले काम हे राजकारण असते. राजकारणात दोन्हींची अवश्यकता असते. जिथे संख्याबळ कमी आहे अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही जिंकलो आहोत. जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असोत. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी एकट्याने 17 मते फोडले होते. मात्र कुठलेही सामर्थ मागे नसताना ते करून दाखविले. आता दिल्लीत नरेंद्र मोदी यांचे मोठे सामर्थ उभे आहे. विकासाची दृष्टी देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. नक्कीच याचा परिणाम झाला असेल," असे सांगताना त्यांनी या विजयाचे श्रेय मात्र पंतप्रधान मोदींनाच दिले.

महाराष्ट्रात परिवर्तन होणार का यावर विचारले असता त्यांनी सांगितले की, "मी या प्रक्रियेचा भाग नाही. त्यामुळे याचे उत्तर मी देऊ शकत नाही," असे म्हणत त्यांनी राज्यातील राजकारणावर बोलणे टाळले.

Pankaja Munde News, Ahmednagar News
पाथर्डीत शक्तीप्रदर्शन करत पंकजा मुंडे देणार भाजपला संदेश...

शिवाजीराव कर्डिलेंची घेतली भेट

पंकजा मुंडे आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी सकाळी स्नेहालय संस्थेला भेट दिली. त्यानंतर त्यांनी आमदार मोनिका राजळे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या समवेत ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. आज दुपारी मुंडे यांची पाथर्डीत सभा होणार आहे. या सभेत मुंडे यांची पुढील राजकीय दिशा जाहीर होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in