मोर्चा राष्ट्रवादीच्या कल्याणराव काळेंचा अन्‌ दोन गट पडले काँग्रेसमध्ये!

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली येत्या सोमवारी (ता. ११ एप्रिल) तहसील कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
 Kalyanrao Kale
Kalyanrao KaleSarkarnama

पंढरपूर : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पंढरपूर (Pandharpur) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांच्या नेतृत्वाखाली येत्या सोमवारी (ता. ११ एप्रिल) तहसील कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चावरुन मात्र काँग्रेसमध्येच (Congress) दुफळी निर्माण झाली आहे. काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष अमरजित पाटील यांनी ‘काळे यांनी काढलेल्या मोर्चाशी काॅंग्रेसचा कोणताही संबंध नसून यामध्ये तालुका काँग्रेस कमिटी सहभागी होणार नसल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. दुसरीकडे शहराध्यक्ष ॲड. राजेश भादुले यांनी मात्र आपण मोर्चात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मोर्चावरुन काँग्रेसमध्ये दोन पडल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. (On the Kalyanrao Kale's morch, two groups fell in Pandharpur Congress)

शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्वपक्षीय निषेध आंदोलन केले होते. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके वगळता राष्ट्रवादीसह मित्र पक्षांचे हाताच्या बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप आणि ॲड सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्या घटनेचा निषेध केला होता.

 Kalyanrao Kale
भाजप विद्यमान ५० आमदारांचा पत्ता कट करणार?; विजयासाठी प्रत्येक मतदारसंघात सर्वेक्षण

कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली येत्या सोमवारी (ता. ११ एप्रिल) पुन्हा महाविकास आघाडीच्या वतीने या घटनेचा निषेध म्हणून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. काळे यांनी स्वतःच्या नावाने छापलेली पत्रकेदेखील तालुक्यातील गावोगावी वाटली आहेत. काळे यांच्या या पत्रकबाजीवरुन राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. या संदर्भात रविवारी (ता.१० एप्रिल) पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली. त्यामध्येही राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकाबाजीवरुन नाराजी व्यक्त केली आहे. काळे यांनी छापलेल्या पत्रकावर भगीरथ भालके यांचे नाव नसल्याने भालके यांच्या समर्थकांनाही काळेंविषयी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.

 Kalyanrao Kale
भावाच्या अपघातानंतर गोपीचंद पडळकर सातारा दौरा सोडून विट्याकडे रवाना

मोर्चाच्या पत्रकावरून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य सुरु असतानाच काॅंग्रेसचे पंढरपूर तालुकाध्यक्ष अमरजित पाटील यांनी ही काळे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चाला विरोध केला आहे. दोन दिवसांपूर्वी निषेध आंदोलन झाल्यानंतर पुन्हा मोर्चा कशासाठी असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. राजेश भादुले यांनी मात्र आपण मूक मोर्चात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीत सुरु असलेल्या अंतर्गत धुसफूसीनंतर आता काॅंग्रेसमध्येही दोन गट पडल्याचे समोर आले आहे. दरम्यान उद्याच्या मूक मोर्चात शिवसेना सहभागी होणार असल्याचे शहर प्रमुख रवी मुळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com