Satara : शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवर फडणवीसांनी दिले हे आश्वासन...

सातारा औद्योगिक क्षेत्रातील Satara MIDC समस्या सोडविण्याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस Devendra Fadanvis आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी पुढाकार घेतला त्याबद्दल दोघांचे मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या MAAS पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.
Shivendraraje Bhosale, Devendra Fadanvis
Shivendraraje Bhosale, Devendra Fadanvissarkarnama

सातारा : सातारा येथे केंद्र शासनाने १०० बेडचे कर्मचारी राज्य बीमा निगमचे हॉस्पिटल मंजूर केले आहे. त्यासाठी औद्योगिक क्षेत्रालगत पाच एकर जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच नवीन विदयुत उपकेंद्र उभारणीसाठी अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील ६० गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या दोन्ही मागण्यांना श्री. फडणवीस यांनी सकारत्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे साताऱ्यात कर्मचारी विमा निगमचे हॉस्पिटल आणि नवीन विद्युत उपकेंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सातारा जिल्हामध्ये कर्मचारी राज्य विमा निगमचे हॉस्पिटल किंवा संलग्न केलेले हॉस्पिटल उपलब्ध नाही. त्यामुळे हे हॉस्पिटल होण्याबाबत मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) मार्फत गेली अनेक वर्षे पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असून केंद्र शासनाने सातारा जिल्ह्याकरिता १०० बेडचे कर्मचारी राज्य विमा निगम हॉस्पिटल मंजूर केले आहे. त्यासाठी त्यांना सातारा औद्योगोक क्षेत्रालगत पाच एकर जागेची आवश्यकता आहे.

सातारा औद्योगिक क्षेत्रामधील उद्योगांची वीजेची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी सातारा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामध्ये महावितरणचे नवीन उपकेंद्र होणे आवश्यक आहे. सदरच्या नवीन उपकेंद्र उभारणीसाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध झाला असून महावितरणला सदरचे सबस्टेशन उभारणी करीता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून सातारा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामध्ये फक्त ६० आर जमीन हवी आहे. या दोन मागण्यांसाठी मासच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे नुकतीच भेट घेतली.

Shivendraraje Bhosale, Devendra Fadanvis
Patan : निवडणुकांपुरते मतदारसंघात फिरणाऱ्यांपासून सावध राहा : शंभूराज देसाई

शिवेंद्रसिंहराजे यांनी श्री. फडणवीस यांचेशी सविस्तर चर्चा केली. त्यामुळे कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचेकडील प्रस्तावित सातारा मेडिकल कॉलेजच्या बाजूला उपलब्ध असलेल्या जागेमधील पाच एकर जागा कर्मचारी राज्य विमा निगमचे हॉस्पिटलला देण्याची अनुकुलता श्री. फडणवीस यांनी दर्शवली आहे. तसेच त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. एमआयडीसीमध्ये नवीन विदयुत उपकेंद्र झाल्यामुळे उद्योगवाढीस चालना मिळून सातारा औद्योगिक क्षेत्रासोबतच आजूबाजूच्या प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रास फायदा होऊ शकेल आणि पुढील १५ वर्षे उद्योजकांना वीजेची कमरता भासणार नाही.

Shivendraraje Bhosale, Devendra Fadanvis
Patan : 'मविआ' नेत्यांकडून शिंदे, फडणवीस सरकारमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न... देसाई

यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी मास पदाधिकाऱ्यांच्या समवेत उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांचीही भेट घेतली. यावेळी मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, खजिनदार भरत शेठ आदी उपस्थित होते. दरम्यान, सातारा औद्योगिक क्षेत्रातील महत्वाच्या समस्या सोडविण्याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला त्याबद्दल दोघांचेही सर्व उद्योजकांच्यावतीने मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) च्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.

Shivendraraje Bhosale, Devendra Fadanvis
Satara : शेतकऱ्यांकडे दूर्लक्ष नको.. अन्यथा, हातात वाडगं घेऊन बसावे लागेल... उदयनराजे भडकले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com