सोमय्यांच्या टीकेवर गृहराज्यमंत्री म्हणाले, कितीही त्रास दिला तरी शिवसेना डगमगणार नाही...

शंभूराज देसाई Shambhuraj Desai म्हणाले, किरीट सोमय्या Kirit Somayya यांच्याकडे किती लक्ष द्यायचं हे आता ठरवायची वेळ आली आहे.
Shambhuraj Desai, Kirit Somayya
Shambhuraj Desai, Kirit Somayyasarkarnama

सातारा : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि दादर येथील मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. या कारवाईच्या विरोधात बोलताना राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, केंद्रातील लोकांविरुद्ध जे बोलतायत आणि मुद्दाम जुनी प्रकरणे बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे. पण, कोणी कितीही त्रास दिला, अडचणी आणल्या तरी शिवसेना डगमगणार नाही.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राउत यांच्यावर टीका केली आहे. या बाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना विचारले असता त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Shambhuraj Desai, Kirit Somayya
Video: अनिल परबांच्या विरोधात जनहित याचिकादाखल करणार; किरीट सोमैय्या

शंभूराज देसाई म्हणाले, ''किरीट सोमय्या यांच्याकडे किती लक्ष द्यायचं हे आता ठरवायची वेळ आली आहे. ते नेहमीच आरोप करत असतात. कोणत्या तरी जुन्या गोष्टी काढायच्या आणि त्यावर आरोप करायचे ही त्यांची सवय होऊन बसली आहे. त्यामुळे शिवसेना अशा तथ्य हिन आरोपांकडे फारसे लक्ष देत नाही. केंद्रातील लोकांविरोधात जे बोलतात त्यांची मुद्दामहून जुनी प्रकरणे बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे. पण, कोणी कितीही त्रास दिला, अडचणी आणल्या तरी शिवसेना डगमगणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com