रामराजेंच्या भेटीवर उदयनराजे म्हणाले, माझा कोणीही.....

तुम्ही सध्या खूपच सक्रिय झाला आहात, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, मी नेहमीच सक्रिय होतो. ज्यांना दिसलो नाही ते त्यावेळी सक्रिय नव्हते. त्यांच्या डोळ्यावर काही पडदा बांधलेला असावा, असेही ते मिश्किलपणे म्हणाले.
रामराजेंच्या भेटीवर उदयनराजे म्हणाले, माझा कोणीही.....
Ramraje Nimbalkar, Udayanraje Bhosalesarkarnama

सातारा : माझा कोणीही शत्रु नाही. तसेच मी त्या बरोबरीचा कोणाला समजतच नाही. आमच्यात वैचारिक मतभेद असणारच. कारण माझी बांधिलकी तत्वाशी आहे, असे सांगून जिल्हा बँकेत कोणाच्या वाटणीला काय येतंय यावर निवडणूक बिनविरोध होणार का हे ठरणार आहे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

खासदार उदयनराजे भोसले व विधान परिषदेच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज शासकिय विश्रामगृहात बंद खोलीत चर्चा केली. या विषयी खासदार उदयनराजेंकडून जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. रामराजेंच्यासोबतचा तुमचा संघर्ष पाहिला आहे. आज ते तुमच्या भेटीला आले होते. नेमकी काय चर्चा झाली. यावर उदयनराजे म्हणाले, माझा कोणी शत्रु नाही. मी त्या बरोबरीचा कोणाला समजतच नाही.

Ramraje Nimbalkar, Udayanraje Bhosale
ज्या विश्रामगृहात वाद झाला.. तेथेच रामराजे आणि उदयनराजे भेटले...

आमच्यात वैचारिक मतभेद असणारच आहेत. माझी बांधिलकी तत्वाशी आहे. तत्वाला धरून विचार मांडले होते. त्यांच्याशी माझे शत्रुत्व असण्याचे कारण नाही. जिल्हा बँक बिनविरोध होईल, असे वाटते का, माझ्या वाटण्या न वाटण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येकाच्या वाटणीला काय येतंय त्याच्यावर ते ठरणार आहे. माझ्या वाटण्याचा प्रश्न नाही, उदयनराजे कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Ramraje Nimbalkar, Udayanraje Bhosale
गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही? ः संजय राऊत

उदयनराजेंचे मोठे वलय आहे, शब्दाला किंमत आहे, यावर ते म्हणाले, जे लोक हे सर्व पहात असतील ते सर्व पोट धरून हसत असतील. मी या भानगडीत पडत नाही. काम करत राहणे लोकांची सेवा करणे, हे माझे काम आहे. तुम्ही सध्या खूपच सक्रिय झाला आहात, या प्रश्नावर ते म्हणाले, मी नेहमीच सक्रिय होतो. ज्यांना दिसलो नाही ते त्यावेळी सक्रिय नव्हते. त्यांच्या डोळ्यावर काही पडदा बांधलेला असावा, असेही ते मिश्किलपणे म्हणाले.

Related Stories

No stories found.