नगर राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर : पक्ष वाढीसाठी जोर-बैठका

युवक-युवती, विद्यार्थी, सांस्कृतिक आघाडी, अशा विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके ( Rajendra Phalke ) यांनी कंबर कसली आहे.
Rajendra Phalke, NCP
Rajendra Phalke, NCPSarkarnama

अशोक निंबाळकर

NCP News : राज्यातील सत्ताबदलानंतर भाजपने राष्ट्रवादीला टार्गेट केले आहे. मात्र, राष्ट्रवादीने टीकाटिप्पणीऐवजी पक्षसंघटन मजबुतीचे टार्गेट ठेवले आहे. त्यासाठी जोर-बैठका सुरू आहेत. युवक-युवती, विद्यार्थी, सांस्कृतिक आघाडी, अशा विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके ( Rajendra Phalke ) यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यात प्राथमिक सभासदांची संख्याही दुप्पट केली जाणार आहे. परिणामी, सक्रिय सदस्यांची संख्याही आपोआप वाढणार आहे. पक्षकार्यकारिणीची तीन वर्षांची मुदत संपल्याने त्यादृष्टीनेही चाचपणी सुरू आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष फाळके यांनी काल (मंगळवारी) पक्षकार्यालयात जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली. तीत संगमनेर, कोपरगावचे तालुकाध्यक्ष वगळता बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्याकडून तालुक्यातील प्राथमिक सभासदांची माहिती घेण्यात आली. पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यासाठीही रणनीती आखली आहे. दुसऱ्या टप्प्यात युवक-युवती व विद्यार्थी सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली जाणार आहे.

Rajendra Phalke, NCP
राजेंद्र फाळके म्हणाले, प्रताप ढाकणे षटकार मारणार...

जिल्ह्यात सध्या पक्षाचे 15 हजार प्राथमिक सभासद आहेत. ते 30 हजारांपर्यंत वाढविण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. सक्रिय सभासद दीड हजारांवरून दुप्पट, म्हणजे तीन हजार होतील. त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, तसेच इतर निवडणुका कधी होतील याची शाश्वती नसल्याने, राष्ट्रवादीने सध्या संघटनावाढीकडे लक्ष दिले आहे. राज्य सरकारबाबतही साशंकता असल्यानेच पक्षसंघटना मजबुतीकडे मोर्चा वळविला आहे.

Rajendra Phalke, NCP
Dr. Sujay Vikhe Patil : भाजपचा महापौर असताना नगर शहरात मोठी विकासकामे झाली

प्रदेशाध्यक्ष देणार कानमंत्र

जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना संघटनेच्या वाढीसाठी, तसेच आगामी काळात भाजपला टक्कर देण्यासाठी कोणते धोरण अवलंबायचे, याविषयी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहेत. पुढील आठवड्यात त्यांची बैठक आयोजित केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्लीत होत आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने संघटन वाढीस गती दिली जाणार आहे.

पक्षांतर्गत निवडणुकीकडे लक्ष

राष्ट्रवादीत दर तीन वर्षांनी निवडणुका होतात. सध्याच्या कार्यकारिणीची मुदत संपली आहे. त्या निवडणुकीकडेही पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडी करताना सर्वांगीण विचार केला जाणार आहे.

Rajendra Phalke, NCP
नगर दक्षिण लोकसभा राष्ट्रवादीचं लढवणार : राजेंद्र फाळके 

राष्ट्रवादी पक्ष नेहमीच समाजकारणावर भर देतो. त्यामुळे सत्ता असो नाही तर नसो; त्याचा पक्षावर काही परिणाम होत नाही. पक्षात काम करण्यासाठी तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच उत्सुक आहेत. त्यामुळे नक्कीच प्राथमिक सभासद दुप्पट होतील. प्राथमिक सभासद हेच पक्षाचे ॲसेट आहे.

- राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in