Dilip Walse Patil
Dilip Walse PatilSarkarnama

वळसे पाटलांचे नगरमधील जुने कार्यकर्ते एकवटले : पालकमंत्री बदलाच्या चर्चेला उधाण

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil ) आणि उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांच्या नावाची पालकमंत्री पदासाठी चर्चा सुरू आहे.

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री बदलांच्या चर्चेला पुन्हा वेग आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil ) आणि उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांच्या नावाची चर्चाही सुरु आहे. वळसे पाटील अनेक वर्ष अहमदनगरचे पालकमंत्री होते. त्यामुळे हा अनुभव पाहता त्यांना संधी मिळणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्यातच काल (शुक्रवार) एका खाजगी कार्यक्रमाला आलेल्या वळसे पाटील यांना भेटण्यासाठी जुने कार्यकर्ते पहिल्यांदाच भेटीसाठी एकवटल्याचे पहायला मिळाले. ( Old activists of Walse Patal gathered in the town: Discussions on change of Guardian Minister are in full swing )

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे कोल्हापुर जिल्ह्याची जबाबदारी आहे. जिल्हा बॅंक, दूध संघ व अन्य महत्वाच्या संस्थावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहे. त्यामुळे कोल्हापूरची जबाबदारी पाहताना अहमदनगरला वेळ देता येत नसल्याचे सांगत हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Dilip Walse Patil
राज्यात लवकरत ७२०० पोलिसांची भरती : वळसे-पाटील

गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा अहमदनगरचे पालकमंत्री बदलाच्या चर्चेला वेग आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अनेक वर्षे अहमदनगरचे पालकमंत्री होते. त्यांचा कार्यकाळात स्थानिक स्वराज्य संस्थासह प्रमुख निवडणुकांत राष्ट्रवादीने यश मिळवले होते. त्यामुळे आता वळसे व तनपुरे यांची नावे चर्चेत असली तरी अहमदनगर जिल्ह्यातील जुन्या कामाचा अनुभव पाहता वळसे पाटील यांना अहमदनगरच्या पालकमंत्रीपदाची संधी मिळेल असे वळसे पाटील यांच्या जुन्या सहकाऱ्यांना वाटत आहे.

पक्षीय राजकारण नवनव्याने कार्यकर्त्यांची भर पडते आणि ओघाने जुने कार्यकर्ते काहीसे बाजुला होतात. एका खाजगी कार्यक्रमासाठी वळसे पाटील बऱ्याच दिवसांनी नगरला आले. त्यांचे नगरला येणे आणि पालकमंत्री बदलाच्या सुरु असलेल्या चर्चा हा योगायोग असला तरी वळसे पाटील यांच्या भेटीला मात्र राष्ट्रावादीचे जुने कार्यकर्ते एकवटल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यात माजी आमदार दादा कळमकर, रावसाहेब मस्के, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू, अशोक बाबर यांच्यासह अनेकांचा समावेश होता. शेतकरी मराठा महासंघाचे नेते संभाजी दहातोंडे यांनीही वळसे यांचे स्वागत केले.

Dilip Walse Patil
55 वर्षावरील पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम ; दिलीप वळसे पाटील,पाहा व्हिडिओ

पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील - वळसे

राज्याचे ग्रामविकास हसन मुश्रीफ यांनी अहमदनगरचे पालकमंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी अहमदनगरचे पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष काम केले आहे. त्यामुळे या पालकमंत्रीपद तुम्ही घेणार का ? अशी विचारणा केली असता, त्यांनी हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.राज्यात द्राक्ष फळबागेखालील क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, यासाठी मॉलमध्ये वाईन्स विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी भूमिका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्‍त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com