रुपाली चाकणकरांविरोधात आक्षेपार्ह कमेंट : बार्शीच्या तरुणाला अटक; २८ जणांवर गुन्हा

वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फेसबुक पोस्ट केली होती.
रुपाली चाकणकरांविरोधात आक्षेपार्ह कमेंट : बार्शीच्या तरुणाला अटक; २८ जणांवर गुन्हा
Rupali Chakankar Sarkarnama

सोलापूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (NCP) माजी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या २८ जणांविरोधात बार्शी (Barshi) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बार्शीच्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या बाबतची तक्रार राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून करण्यात आली होती. (Offensive comments against Rupali Chakankar; Barshi youth arrested)

वटपौर्णिमाबाबत रूपाली चाकणकर यांनी एक भूमिका मांडली होती. या भूमिकेबाबत एका फेसबुक पेजवरील पोस्टवर युवराज ढगे याने आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्यानंतर पोलिसांनी चार दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्राच्या विविध भागातील २८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Rupali Chakankar
विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबाबत हितेंद्र ठाकूरांचे मोठे वक्तव्य!

वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फेसबुक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की,‘मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारलेले नाहीत. माझ्या नवऱ्यानेही कधी तसा हट्ट केलेला नाही.' अशी पोस्ट चाकणकर यांनी शेअर केली होती. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी' समाजाला सत्यावानाची सावित्री कळली. मात्र ज्योतिबांची सावित्री कळलीच नाही' असं वक्तव्य केलं होतं.

Rupali Chakankar
विधान परिषदेला मतदान केल्यानंतर संजयमामा शिंदेंनी केला हा दावा!

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे यांनी युवराज ढगे याच्याविरोधात बार्शी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीनुसार भांदवि कलम ५०९, ५००, ३५४ अ बाबी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in