दूध पंढरीच्या आखड्यात निवडणुकीआधीच माने, शिंदे, साठे, सोपलांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!

हरकती आल्या परंतु, त्या हरकती मान्य झाल्या की अमान्य? याचा फैसला उद्या (मंगळवारी) सकाळी 11 वाजता होणार आहे.
Dilip Mane-Ranjitshinh Shinde-yogesh Sopal-Baliram Sathe
Dilip Mane-Ranjitshinh Shinde-yogesh Sopal-Baliram Sathesarkarnama

सोलापूर : माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे (baliram sathe), जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, दूध संघाचे माजी संचालक योगेश सोपल व दीपक माळी यांच्यासह 35 उमेदवारी अर्ज हरकतींच्या कचाट्यात अडकले आहेत. सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे (दूध पंढरी, Dudh pandhari) निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे व दुग्धचे सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे यांनी आज उमेदवारी अर्जांची छाननी केली. हरकती आल्या परंतु, त्या हरकती मान्य झाल्या की अमान्य? याचा फैसला उद्या (मंगळवारी) सकाळी 11 वाजता होणार आहे. (Dudh Sangh Election: Objection on applications of 35 candidates including Mane, Shinde, Sathe, Sopal)

दूध संघाच्या संचालकांच्या 17 जागांसाठी दाखल झालेल्या 133 उमेदवारी अर्जांची आज सकाळी 11 पासून जिल्हा दूध संघाच्या मुख्यालयात छाननी झाली. आज झालेल्या छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी उद्या (मंगळवार) सकाळी 11 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. दूध संघाच्या उमेदवारी यादीतून कोणाचा पत्ता कट झाला?, कोणाची उमेदवारी वैध ठरली? या बद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. उद्या वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्यानंतर उद्यापासूनच 15 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास मुदत देण्यात आली आहे.

Dilip Mane-Ranjitshinh Shinde-yogesh Sopal-Baliram Sathe
डिसले गुरुजी अडकले आपल्याच चक्रव्यूहात; शिक्षण विभागाने मागितला या गोष्टींचा खुलासा!

कुणबी मराठा कार्डचा वापर

जिल्हा दूध संघात संचालक होण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे आणि करमाळ्याचे विकास गलांडे यांनी क्रियाशिल संस्था सभासदांमधून निवडून दिल्या जाणाऱ्या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या शिवाय या दोघांनीही मराठा कुणबी या प्रमाणपत्राचा उपयोग करत इतर मागासवर्गीय प्रतिनिधींमधून निवडल्या जाणाऱ्या मतदारसंघासाठीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दूध संघात संचालक म्हणून येण्यासाठी रणजितसिंह शिंदे व विकास गलांडे यांनी कुणबी मराठा कार्डचा उपयोग केला आहे.

Dilip Mane-Ranjitshinh Shinde-yogesh Sopal-Baliram Sathe
भाजप आमदारास चिमटे घेत ढोबळेंकडून राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचे कौतुक!

यांचे अर्ज अडकले हरकतीत

क्रियाशील संस्था सभासद मतदार संघ (24 हरकती) : दिलीप माने, बळीराम साठे, बबनराव अवताडे, रणजितसिंह शिंदे, योगेश सोपल, सिद्धेश्वर आवताडे, दीपक माळी, विजय यलपल्ले, नारायण गुंड, अलका बंडगर, विकास गलांडे, हनुमंत पोटरे, दाजी दोलतडे, संतोष वावरे, वालचंद मुंडे, प्रभाकर कोरे, ललिता लवटे, सरस्वती भोसले, कौशल्या नवले, संताजी पाटील, तायप्पा गरंडे, संगीता लोंढे, पांडुरंग भाकरे. महिला प्रतिनिधी मतदार संघ (5 हरकती) : अलका बंडगर, ज्योती सावंत, रेवती साखरे, सरस्वती भोसले, कौशल्या नवले. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी (5 हरकती) : विकास गलांडे, दिपक माळी, ज्योती सावंत, रणजितसिंह शिंदे, प्रभाकर कोरे. भटक्‍या विमुक्त जाती/जमाती/विशेष मागासवर्ग प्रतिनिधी (1 हरकत) : शहाजी पाटील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com