'महाविकास'च्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेले...योगेश टिळेकर

महाविकास आघाडी Mahavikas Aghadi सरकारने government ओबीसींचे OBC राजकिय Political नेतृत्वच तयार होऊ नये, ही भूमिका घेतली आहे.
BJP Andolan satara
BJP Andolan satarasarkarnama

सातारा : ओबीसींके सन्मान मे, भाजपा मैदान मे., आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे., कोण म्हणतंय देत नाय..घेतल्याशिवाय राहणार नाय, अशी घोषणाबाजी करत भारतीय जनता पक्षाने साताऱ्यातील बॉम्बे चौकात ओबीसींचे राजकिय आरक्षण पुर्ववत करावे, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींना आरक्षण मिळू शकले नसल्याचा आरोप यावेळी भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार योगेश टिळेकर यांनी केला.

महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींना आरक्षण मिळू शकले नाही. याचा निषेध नोंदवत भारतीय जनता पक्षाने माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी योगेश टिळेकर म्हणाले, ओबीसींचे राजकिय आरक्षण पूर्ववत व्हावे, यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहोत. मध्यप्रदेश सरकारने ओबीसींचे राजकिय आरक्षण पूर्ववत केले आहे. पण महाविकास आघाडी सरकारने आपल्या राज्यात ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा घाट घातला आहे. मागासवर्गीय आयोग गठीत करून इन्पिरिकल डेटा तयार करा व ओबीसींना न्याय द्यावा, असे न्यायालयाने सांगितले असून या सरकारने त्यासाठी निधी दिला नाही.

महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे राजकिय नेतृत्वच तयार होऊ नये, ही भूमिका घेतली आहे. मात्र, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजप ओबीसींना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा देत आहेत. अजित पवारांच्या हातात तिजोरीच्या चाव्या असूनही त्यांनी मागासवर्गीय आयोगाला निधी दिला नाही. उलट नवाब मलिकांचे दाऊदशी संबंध असताना राज्य सरकारच्या पैशातून त्यांना बाहेर काढण्यासाठी चांगला वकिला दिला जात आहे.

मध्यप्रदेश सरकारचा निकाल या सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. यामुळे राज्य सरकार तोंडावर पडले असून केवळ वेळकाढूपणा केल्याने राजकिय आरक्षण जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. येत्या २५ तारखेला आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढणार असून रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार असल्याचे श्री. टिळेकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com