OBC निकालाने राजकीय नेत्यांची वाढली डोकेदुखी

OBC आरक्षणा संदर्भातील निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ), शिवसेना ( Shivsena ) व भाजपच्या ( BJP ) स्थानिक नेत्यांसमोर नवीन राजकीय पेच निर्माण झाला आहे.
OBC Reservation

OBC Reservation

Sarkarnama

पारनेर ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगर पंचायतीतील प्रत्येकी चार जागा ओबीसी आरक्षणामुळे राखीव ठेवण्यात होत्या. या जागेवर आता खुल्या गटातून निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ), शिवसेना ( Shivsena )भाजपच्या ( BJP ) स्थानिक नेत्यांसमोर नवीन राजकीय पेच निर्माण झाला आहे. OBC verdict raises headaches for political leaders

पारनेर नगरपंचायतीच्या ओबीसीसाठी राखीव असलेल्या चार जागा न्यायालयाच्या निर्णयानुसार पुन्हा आरक्षण काढण्यात आले होते. त्या नुसार आता या चार जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. त्यातील दोन महिलांसाठी तर दोन जागा पुरूषांसाठी राखीव झाल्या आहेत. या जागांवर या पूर्वी ओबीसी उमेद्वार सर्वच पक्षांच्या नेते मंडळींनी निश्चित केले होते. आता या जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने तेथे कोणाला उमेद्वारी द्यावी ही नव्याने नेत्यांची वेगळीच डोकेदुखी सुरू झाली आहे.

<div class="paragraphs"><p>OBC Reservation</p></div>
सुजय विखे विरुद्ध निलेश लंके या लढाईच्या सेमीफायनलची तयारी जोरात

ओबीसींसाठी राखीव असलेल्या चार जागांचे नव्याने 23 डिसेंबरला आरक्षण काढण्यात आले होते. त्या जागांवर दोन ठिकाणी महिला तर दोन जागा पुरूषांसाठी राखीव निघाल्या आहेत. आता मात्र या जागांवर अनेक ओबीसी उमेद्वार या पूर्वी निश्चित केले होते. काहींनी तर उमेद्वार अर्जही दाखल केले होते. आता त्यांनाच खुल्या जागेवर पुन्हा उमेद्वारी द्यावयाची की खुल्या प्रवर्गातील उमेद्वारास उमेद्वारी द्यावी, अशी द्विधा अवस्था पक्ष प्रमुखांची व नेते मंडळींची झाली आहे.

ओबीसी जागांवरील आरक्षण न्यायालयाने जरी रद्द केले असले तरीही पक्ष किंवा राजकीय नेते मंडळी ओबीसी समाजाला नाराज करण्यास तयार नाहीत. त्यामुळे ते पुन्हा त्या जागांवर ओबीसी उमेद्वारांनाच उमेद्वारी देण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे त्यामुळे खुल्या प्रवर्गातील उमेद्वार नाराज तर होणार नाहीत ना अशी शंकाही नेते मंडळीच्या मनात आहे. तसेच जर ओबीसीचा उमेद्वार दिला तर तो खुल्या प्रवर्गातील मतदारांना व खुल्या प्रवर्गातील उमेद्वार दिला तर तो ओबीसी मतदारांना रूचेल का अशीही शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे उमेद्वार कोणता द्यावा, अशी चिंता निर्माण झाली आहे.

<div class="paragraphs"><p>OBC Reservation</p></div>
कोण म्हणतं मी राजकारणातून बाजूला गेलो : विजय औटी

ओबीसीचे 27 टक्के आरक्षण न्यायालयाने ग्राह्य धरले नाही. त्यामुळे ओबीसीच्या जागा रद्द झाल्या. हे जरी खरे असले तरी ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसी व खुला वर्ग यामध्ये राजकीय व प्रशासकीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.

नगरपंचायतीच्या प्रभाग दोन व 14 सर्वसाधारण महिलेसाठी तर प्रभाग 11 व 13 सर्वसाधारण जागेसाठी खुले झाले आहेत. त्यासाठी 18 जानेवारीला निवडणूक होणार आहे. या पूर्वी नगरपंचायतीच्या 21 डिसेंबरला झालेल्या 13 प्रभागातील मतदानाची व 18 जानेवारीस होणाऱ्या चार प्रभागातील मतदानाची मतमोजणी 19 जानेवारीस होणार आहे.

नगरपंचायतीच्या उर्वरीत चार जागांसाठी 29 डिसेंबर ते तीन जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी आहे. 10 जानेवारी अखेर अर्जमाघारी घेण्यासाठी मुदत आहे. तर 18 जानेवारीस मतदान आणि 19 जानेवारीस मतमोजणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com