ओबीसी आरक्षण : सोलापूर झेडपीत २०, तर पंचायत समितीत ३६ जागा असणार!

येत्या गुरुवारी होणार आरक्षण सोडत; ता. २९ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान या आरक्षण सोडतीवर दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. या आरक्षणाला ५ ऑगस्ट रोजी अंतिम मान्यता दिली जाणार आहे.
Solapur ZP
Solapur ZPSarkarnama

सोलापूर : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकींमध्ये ओबीसी आरक्षणाचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मोकळा झाला आहे. सोलापूर (Solapur) जिल्हा परिषदेतील (ZP) ७७ जागांपैकी २० जागा ओबीसींसाठी आरक्षित (OBC Reservation) असणार आहेत. जिल्ह्यातील ११ तालुका पंचायत समित्यांमधील १५४ जागांपैकी ३६ जागा ओबीसींसाठी आरक्षित राहण्याची शक्‍यता आहे. (OBC Reservation : Solapur ZP's 20 seats & 36 seats in Panchayat Samiti Reserv)

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी येत्या गुरुवारी (ता. २८ जुलै) आरक्षण सोडत काढली जाणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेसाठी दुपारी तीनच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात, तर पंचायत समिती सदस्यांसाठी गुरुवारी सकाळी अकराच्या दरम्यान त्या त्या तालुक्‍याच्या ठिकाणी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. येत्या २९ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान या आरक्षण सोडतीवर दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. या आरक्षणाला ५ ऑगस्ट रोजी अंतिम मान्यता दिली जाणार आहे.

Solapur ZP
'...तेव्हा पवारसाहेब, अजितदादा मार्गदर्शक असतीलच; पण निर्णय नवीन पिढी घेईल...'

जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ६८ वरून ७७ झाली आहे. जिल्हा परिषदेची प्रभाग रचना अंतिम करण्यात आली असून आरक्षण सोडत झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या लढती स्पष्ट होणार आहेत. आरक्षण प्रक्रिया झाल्यानंतर मतदार यादी प्रसिद्धीचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

Solapur ZP
राजेंद्र गावित नेमके कुणाचे...? शिंदेंबरोबर जाऊनही भाजपने लावले वाढदिवसाचे बॅनर!
  • सोलापूर झेडपीत अशा असतील प्रवर्गनिहाय जागा

    1. एकूण जागा : ७७

    2. ओबीसी : २० (१० महिला)

    3. अनुसुचित जाती : १२ (६ महिला)

    4. अनुसुचित जमाती : १ (१ महिला)

    5. सर्वसाधारण : ४४ (२२ महिला)

Solapur ZP
शिवसेनेच्या नगरसेवकांची आज उद्धव ठाकरे घेणार एकनिष्ठतेची शिकवणी!

पंचायत समित्यांमधील प्रवर्गनिहाय जागा

  • एकूण जागा : १५४

  • ओबीसी : ३६ (२२ महिला-तालुक्‍यातील ५० टक्के आरक्षण मर्यादेमुळे)

  • अनुसुचित जाती : २४ (१२ महिला)

  • अनुसुचित जमाती : ०१ (०१ महिला)

  • सर्वसाधारण : ९३ (४२ महिला)

प्रभाग रचनेचे चित्र उद्या स्पष्ट होणार

सांगोला, मोहोळ व माळशिरस तालुक्‍यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गटाच्या अंतिम प्रभाग रचनेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेल्या आहेत. या याचिकांवर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झालेला आहे. राज्य निवडणूक आयोगाला त्यांची भूमिका सोमवारी (ता.२५ जुलै) मांडण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली आहे. सोमवारच्या सुनावणीत गट व गणाच्या अंतिम प्रभाग रचनेचे चित्र स्पष्ट होणार आहे. या सुनावणीकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com