नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना आता माफ करायला हवं: भाजप नेत्याची मागणी

Nupur Sharma case| Hindu Muslim Politics| माफ करणं हा आमच्या नबी (पैगंबर) यांचा स्वभाव आहे.
Nupur Sharma case| Haji Arafat Sheikh
Nupur Sharma case| Haji Arafat SheikhSarkarnama

विश्वभूषण लिमये

सोलापूर : प्रेषित मोहम्मद पैगंबर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजप (BJP) नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. नपूर शर्मा यांना होत असलेला विरोध एकीकडे वाढत चालला असताना दूसरीकडे काही हिंदू संघटना त्यांच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत. त्यानंतर आता भाजप नेते हाजी अराफात शेख (Haji Arafat Sheikh) यांनी देखील नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना आता माफ करायला हवं,अशी मागणी केली आहे. यावर त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे.

"कोणत्याही धर्माबाबत बोलणे चुकीचे आहे, नुपूर शर्मा यांचे वक्तव्य चुकीचे आहे. असे वक्तव्य ऐकल्यानंतर आमच्या ही मनाला वेदना होतात. पण या गोष्टी कोणत्या मौलानापासून बाहेर चर्चेला येतात याचाही विचार व्हावा. नुपूर शर्मा जे बोलल्या तसेच झाकीर नाईक यांनी बोलले होते त्यामुळे त्यांना भारतातून बॅन केले आहे. आम्ही या देशाला बाबरच्या नजरेतून बघू नये तर अजमेरच्या सरकार गरीब नवाज यांच्या नजरेतून बघावं, असंही

Nupur Sharma case| Haji Arafat Sheikh
मुख्यमंत्री घरात बसतात आणि युवराज देश वाऱ्या करतात!

माफ करणं हा आमच्या नबी (पैगंबर) यांचा स्वभाव आहे. इस्लाम माफ करण्याबाबत शिकवण देतो. मृत्यूनंतर आपल्याला अल्ला ला उत्तरे द्यायची आहेत.स्वत: प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या काळात देखील असे अनेक प्रसंग आले, मात्र त्यांनी त्यांना माफ केलं. त्यामुळे जर कोणी माफी मागत असेल तर त्याला माफ करायला हवं. जेव्हा तणाव निर्माण होतो तेव्हा आपलेच गरीब हिंदू, मुस्लिम समाजाचे नुकसान होतं असतं,' असही हाजी अराफात शेख यांनी म्हटलं आहे.

जिथे जिथे बेकायदेशीर कामे झालेत तिथेही बुलडोझर चालले आहे. भाजप चांगले काम करते ते दाखवत नाहीत. काँग्रेस आणि इतर विरोधक ज्यांच्याकडं काही काम नाही असे लोक अशा चर्चा घडवून आणत असतात, अशी टिकाही शेख यांनी केली आहे. तसेच, हाजीअली मशीदीवीर जेव्हा हातोडा चालवला जाणार होता तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी ते थांबवले होते, बांद्रा येथे कब्रस्थान रेल्वेच्या क्षेत्रात येणार होते ते वाचविण्याचे काम आशिष शेलार यांनी रेल्वे मंत्र्यांना फोन करुन केले, पण माध्यमे भाजपच्या या चांगल्या गोष्टी दाखवणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, दिल्ली, मुंबई आणि ठाणे नंतर आता पश्चिम बंगाल पोलिसांनी त्यांना समन्स बजावून २० जूनला हजर राहण्यास सांगितले आहे. मोहम्म्द पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना 20 जून किंवा त्यापूर्वी नरकेलडांगा पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com