MP Ranjitsinh Nimbalkar :'धनगड' ऐवजी 'धनगर' उल्लेख असलेली अधिसूचना प्रकाशित करा

Maharashtra महाराष्ट्रात विशेषत: माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाज हा अत्यंत कष्टकरी व गरीब म्हणून ओळखला जातो.
MP Ranjitsinh Naik Nimbalkar
MP Ranjitsinh Naik Nimbalkarsarkarnama

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण राज्यात धनगर समाज मोठ्याप्रमाणात आहे. राज्य शासनाच्या सुचीसह केंद्राच्या सुचीमध्ये धनगर ऐवजी धनगड असा उल्लेख केलेला आहे. याबाबत केंद्र सरकारने ठोस पावले उचलून धनगड ऐवजी धनगर उल्लेख असलेली अधिसूचना प्रकाशित करावी. यामुळे या समाजाला मोठा दिलासा मिळेल, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभेत केली आहे.

यासंदर्भात बोलताना खासदर निंबाळकर म्हणाले, १९६१ मध्ये तयार केलेल्या ग्रंथ सूचीत धनगड असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र वास्तविक देवनागरी भाषेत त्याचा उच्चार व उल्लेख हा धनगर म्हणूनच करण्यात येतो. याशिवाय कोणत्याही इतर दस्तऐवजामध्ये धनगड असा उल्लेख आढळून आलेला नाही.

राज्य सरकारच्या वतीने तयार केलेल्या सूचीमध्ये धनगर असाच उल्लेख आहे. १९५० पासून आजपर्यंत राज्यात अनुसूचित जातीच्या सूची्ंमध्ये एकुण ३६ जातींचा समावेश आहे. त्यामध्ये धनगड या जातीचे प्रतिनिधीत्व शून्य आहे. मात्र, धनगर समाजाचे प्रतिनिधीत्व राज्यांत मोठे आहे, ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.

MP Ranjitsinh Naik Nimbalkar
Satara : मुठभर लोकांच्या हातात 'रयत'ची सत्ता; प्राध्यापकांवर आंदोलनाची वेळ : उदयनराजे

महाराष्ट्रात विशेषत: माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाज हा अत्यंत कष्टकरी व गरीब म्हणून ओळखला जातो. अनुसूचित जनजातीच्या सूचीमध्ये ३६ व्या क्रमांकावर 'धनगड' नावाचा उल्लेख आढळून येतो. मुळात त्या ठिकाणी 'धनगर' असा उल्लेख करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा बदल करुन धनगर समाजाला न्याय द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

MP Ranjitsinh Naik Nimbalkar
Chhatrapati Sambhaji Raje : शिंदे-फडणवीस, बिळातून बाहेर या, सांगा हे राज्यपाल नकोत ; संभाजीराजे संतापले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in