Satara News : संपात सहभागी जिल्हा परिषदेच्या पाच हजार कर्मचाऱ्यांना नोटीस

Satara ZP संपात सातारा जिल्हा परिषदेचे १३ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. सध्या जिल्हा परिषदेचे कामकाज कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.
Satara Zilla Parishad
Satara Zilla Parishadsarkarnama

Satara News : जुनी पेन्शन Old Pension योजना लागू करावी, या मागणीसाठी सुरु असलेल्या संपात सातारा जिल्हा परिषदेचे Satara Zilla Parishad कर्मचारीही सहभागी झाले आहेत. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून पाच हजार ८०७ कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत. कामावर हजर व्हावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जुन्या पेन्शनसाठी शासकिय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही मागणी सरकारी कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षांपासून सुरू ठेवली आहे. मात्र, सरकार त्याबाबत सकारात्मक निर्णय घेत नसल्याने या वेळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.

या संपात सातारा जिल्हा परिषदेचे १३ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. सध्या जिल्हा परिषदेचे कामकाज कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. शासनाच्या सूचनेनुसार संपावर गेलेल्या जिल्हा परिषदेच्या पाच हजार ८०७ कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत.

Satara Zilla Parishad
Satara To Mumbai : साताऱ्याकडून मुंबईला जाणाऱ्या नव्या कात्रज बोगद्यातील वाहतूक शनिवारी 11 नंतर सहा तास बंद !

या नोटीसीत प्रशासनाने म्हटले की, कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर व्हावे, अन्यथा कारवाई केली जाईल, म्हटले आहे. पण, जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील कर्मचारी संपावर असल्याने अनेकांना ही नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे.

Satara Zilla Parishad
Satara BJP News: महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री भाजपचाच होणार... जयकुमार गोरे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com