लोकसभा नकोच; तुम्ही राज्याचे आर. आर. आबा व्हा : नंदकुमार झावरेंचा नीलेश लंके यांना कानमंत्र

अहमदनगर ( Ahmednagar ) दक्षिण लोकसभा मतदार संघातून पारनेरचे ( Parner ) आमदार नीलेश लंके ( MLA Nilesh Lanke ) निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत.
लोकसभा नकोच; तुम्ही राज्याचे आर. आर. आबा व्हा : नंदकुमार झावरेंचा नीलेश लंके यांना कानमंत्र
SYSTEM

टाकळी ढोकेश्वर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून पारनेरचे आमदार नीलेश लंके निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना आव्हान देण्याची तयारी त्यांनी सुरू केल्याची चर्चा आहे. अशातच पारनेरचे माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी आमदार लंकेंना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे नवी राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. Not the Lok Sabha; You state R. R. Patil : Nandkumar Zhaware's ear mantra to Nilesh Lanke

टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे नगर-कल्याण महामार्ग ते ढोकेश्वर विद्यालय या रस्त्याचे भूमिपूजन झावरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार नंदकुमार झावरे बोलत होते. यावेळी आमदार नीलेश लंके, संस्थेचे विश्वस्त सीताराम खिलारी, माजी सभापती राहुल झावरे, गंगाराम बेलकर, मारुती रेपाळे, संभाजी रोहकले, दादाभाऊ सोनावळे, सरपंच सुनीता खिलारी, उपसरपंच सुनील चव्हाण, दत्तात्रय निवडुंगे उपस्थित होते.

लोकसभा नकोच; तुम्ही राज्याचे आर. आर. आबा व्हा : नंदकुमार झावरेंचा नीलेश लंके यांना कानमंत्र
आमदार नीलेश लंके यांचे तरुणांकडून मंत्र्यांनाही लाजवेल असे स्वागत!

नंदकुमार झावरे म्हणाले, ‘‘तुम्हाला राजकीय भवितव्य मोठे आहे. पक्षातील मंत्री राजेश टोपे, धनंजय मुंडे यांच्यासह राज्यभरातील लोक तुम्हाला कार्यक्रमांना बोलवितात. कोविड सेंटरचे काम राज्यासह देशात गेले. तुम्ही तालुक्याचे नेतृत्व करा, राज्याचे आर. आर. पाटील व्हा. लोकसभा निवडणूक लढवू नका,’’ असा कानमंत्र त्यांनी दिला.

यावर आमदार लंके म्हणाले, की हा रस्ता ज्ञानमंदिरासाठी केला जातोय, याचे समाधान वाटते. ‘जिल्हा मराठा’ने तालुक्यात शिक्षणाचे दार खुले केले. संस्थेचा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर असतो. संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करू.

लोकसभा निवडणूक लढवू नका, असा सल्ला माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी दिल्यानंतर आमदार नीलेश लंके यांनी, मी तुमचा शिष्य आहे. तुमचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून माझे काम सुरू आहे. तुम्ही घालून दिलेली लक्ष्मणरेषा पार करणार नाही, असा शब्दही दिला.

Related Stories

No stories found.