राम शिंदे नव्हे तर शरद पवारचं मागच्या दराने आले..

राम शिंदे यांचे समर्थक सचिन पोटरे यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Sachin Potare
Sachin PotareSarkarnama

Ram Shinde Vs Rohit Pawar : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे हे मागील दरवाजाने आमदार झाले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. याला राम शिंदे ( Ram Shinde ) यांचे समर्थक तथा भाजपचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी उत्तर दिले. कर्जत तालुक्यातील गणेशवाडी येथील एका कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

सचिन पोटरे यांनी काही महिन्यांपूर्वी रोहित पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आले होते. आज त्यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Sachin Potare
तीन वर्षांनंतर राम शिंदे पुन्हा आमदार : कर्जत-जामखेडच्या भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

सचिन पोटरे म्हणाले की, शिंदे साहेबांचे नाव जरी राम असले तरी ते वनवासात नव्हते. तर आपला विधानसभा मतदारसंघ वनवासात होता. हे जनतेच्या हळूहळू लक्षात आले. महाविकास आघाडीचे सरकार असताना राम शिंदेंनी घरात लाल दिवा आणला. त्यांनी वनवासाच्या काळात घराकडे लक्ष दिले. त्यांनी त्यांच्या मुलीसाठी जिल्हाधिकारी स्थळ पाहिले, असे त्यांनी सांगितले.

Sachin Potare
सचिन पोटरे म्हणाले, रोहित पवार यांनी कर्जत तालुक्याचा अपमान केलाय

ते पुढे म्हणाले की, दोन वेळा विधानपरिषदेसाठी, एकदा राज्यसभेसाठी त्यांचे नाव चर्चेत होते. पुढे ते विधानपरिषदेचे आमदार झाले. राम शिंदे हे मागील दाराने आमदार झालेले नाहीत. विरोधक त्यांना पाठीमागच्या दाराने आमदार झाले असे म्हणतात. ते मागील दाराने नव्हेत तर निवडून आलेले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार हे मागील दाराने आले आहेत. राम शिंदे हे पुढील दाराने वाजत गाजत आले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com