काँग्रेस नाही! आपली राज्यघटना, लोकशाही अडचणीत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama

अहमदनगर - काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयातर्फे ( ईडी ) कारवाई सुरू आहे. या विरोधात अहमदनगर जिल्हा काँग्रेसतर्फे केंद्रातील भाजप सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. ( Not Congress, our constitution, democracy in trouble )

बाळासाहेब थोरात म्हणाले, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडी म्हणून एकत्र आले. काम केले. काही बाबतीत आम्हाला एकत्र विचार करावा लागेल. भाजपची कार्यपद्धती, त्यांचे तत्त्वज्ञान मान्य नाही म्हणून आम्ही एकत्र आलो होतो. जे जे आमच्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. त्याला महाविकास आघाडी म्हणून असे ठरले नसले तरी बऱ्याच गोष्टीवर आम्ही भाजपला, त्यांच्या तत्त्वज्ञानाला, कार्यपद्धतीला विरोध करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात यांनी सांगितले राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचे कारण...

ते पुढे म्हणाले की, काँग्रेस हा पक्ष नसून एक तत्त्वज्ञान, विचार आहे. जो विचार राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वात आहे तो विचार काँग्रेसचा आहे. काँग्रेस कधी जाती-धर्माच्या नावावर राजकारण करत नाही. जाती-धर्माचे राजकारण करून राज्यघटनेला अडचणीत आणण्याचे काम होत आहे. ही वस्तुस्थिती आहे. ज्या पद्धतीचे राजकारण भाजप करत आहे, त्यानुसार काँग्रेस नाही, आपली राज्यघटना, लोकशाही अडचणीत आहे. काँग्रेसचा शाश्वत विकास पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तो विचार टिकला पाहिजे या करिता आम्ही प्रयत्न करत आहोत. जनतेने दिशाभूल झाली असेल मात्र जनता एक दिवस शाश्वत विचारावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांना ईडीच्या कार्यालयात बोलावले. त्या फार आजारी होत्या. त्या आजारातून बाहेर येऊन चार दिवसही जाऊ दिले नाहीत तोच त्यांना ईडीची पुन्हा नोटीस आली. त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास भाग पाडले. त्या खंबीरपणे ईडीच्या चौकशीला सामोरे गेल्या. त्यांनी ईडीच्या प्रश्नांना उत्तरे दिली. देशातच जो भाजपला विरोध करतो त्याला ईडी, प्राप्तिकर, सीबीआय या माध्यामातून छळ करायचा. त्याला नामोहरण करण्याचा प्रयत्न करायचा. लोकशाहीत सत्ताधारी असतो तसा विरोधकही असतो. विरोधकांनी त्यांचे काम करावे. सत्ताधाऱ्यांनी त्यांचे काम करावे, ही आदर्श लोकशाहीची पद्धत आहे. मात्र भाजप लोकशाहीत ज्या पद्धतीने काम करत आहे ते अत्यंत निषेधार्य आहे, असे त्यांनी सांगितले.

Balasaheb Thorat
शिवसेनेच्या 'त्या' भूमिकेवर काँग्रेस नाराज : बाळासाहेब थोरात म्हणाले...

बांटिया आयोगाच्या त्रुटी

राज्यातील ओबीसी आरक्षणा बाबत बाळासाहेब थोरात म्हणाले की, ओबीसी आरक्षणाचे कोणीही श्रेय घेऊ लागले आहे. वेगवेगळ्या पद्धतीची मांडणी होऊ शकते मात्र बांटिया आयोग महाविकास आघाडीने स्थापन केला होता. त्या आयोगाकडून इम्पेरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आला. न्यायालयाने त्या आयोगाचा अहवाल मान्य केला. त्यामुळे ओबीसींना न्याय मिळाला. त्यात काही त्रुटी असतील तर त्या काळाच्या ओघात दूर होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in