North Kolhapur Assembly : दुसऱ्या फेरी अखेर कॉंग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर

भाजप कोल्हापूरमध्ये आमदारकीचे खाते उघडणार? की कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाणार याचा फैसला आजच्या निकालानंतर होणार आहे.
North Kolhapur Assembly
North Kolhapur Assemblysarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (12 एप्रिल) मतदान झालं होतं. विधानसभा पोटनिवडणुकीच्या या जागेसाठी सुमारे 60 टक्के मतदान झालं. पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीची मतमोजणी (North Kolhapur Assembly by election counting) सुरवात झाली आहे. पहिल्या व दुसऱ्या फेरीच्या अखेरीत कॉँग्रेसच्या जयश्री जाधव या सुमारे सुमारे तीन हजार मतांनी आघाडीवर आहे.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर झालेल्या या जागेवर ही निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपने सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना उमेदवारी दिली होती.

North Kolhapur Assembly
शिवसेना-मनसे वाद पेटला : 'काल, आज आणि उद्या' पुन्हा व्हायरल

निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आज दुपारी साधारण बारा वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल. त्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने का असेना भाजप कोल्हापूरमध्ये आमदारकीचे खाते उघडणार? की कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाणार याचा फैसला आजच्या निकालानंतर होणार आहे.सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरुवात झाली असून 26 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. सतेज पाटलांच्या कसबा बावड्यातून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

दुसऱ्या फेरी अखेरची मते

जयश्री जाधव मते -१०३७१

सत्यजित कदम मते-५२२४

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com