सतेज पाटलांच्या बालेकिल्यात भाजपचा शिरकाव; 'कसबा बावड्यात घेतली लक्षणीय मतं

Kolhapur | North Assembly election result : खरी लढत सतेज पाटील अन् चंद्रकांत पाटील यांच्यामध्येच
Chandrkant Patil - Satej Patil, Kolhapur north assembly by election News Updates, Kolhapur pot nivadnuk
Chandrkant Patil - Satej Patil, Kolhapur north assembly by election News Updates, Kolhapur pot nivadnukSarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (१२ एप्रिल) मतदान पार पडल्यानंतर आज या मतांची मोजणी पार पडत आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपकडून सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. एकूण २६ फेऱ्यांमध्ये या मतांची मोजणी होणार असून सध्या आठ फेऱ्यांची मोजणी पूर्ण झाली आहे.

आठव्या फेरीनंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना ३३ हजार ९९३ मत मिळाली आहेत. तर भाजपच्या सत्यजित कदम यांना २४ हजार ८४१ मत मिळाली आहेत. त्यामुळे जयश्री जाधव या ९ हजार १५२ मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या चार फेऱ्यांच्या अखेरीही काँग्रेसच्या जयश्री जाधव याच आघाडीवर राहिल्या आहेत. दरम्यान १२ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. विधानसभा पोटनिवडणुकीच्या या जागेसाठी सुमारे ६० टक्के मतदान झाले होते.

Chandrkant Patil - Satej Patil, Kolhapur north assembly by election News Updates, Kolhapur pot nivadnuk
"आमदार जयश्री जाधव यांचे हार्दिक अभिनंदन" : कोल्हापुरात निकालापूर्वीच लागले बॅनर

दरम्यान जाधव यांच्या या भक्कम आघाडीसाठी काँग्रेस आणि त्यातही सतेज पाटील यांच्या बालेकिल्ला असलेल्या कसबा-बावडा भागाचा मोठा वाटा आहे. कसबा-बावडा भागातील मतमोजणी पहिल्या ३ फेऱ्यांमध्ये पूर्ण झाली आहे. या तीन फेऱ्यांमध्ये जयश्री जाधव यांना तब्बल ७५०१ मतांची आघाडी मिळाली आहे. मात्र याच भागात भाजपलाही शिरकाव करण्यात यश आले असून भाजप उमेदवार सत्यजित कदम यांनी लक्षणीय मत मिळवली आहेत.

पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये काँग्रेसच्या जाधव यांना १५ हजार २९९ मत मिळाली. तर भाजपच्या कदम यांना कसबा-बावडा भागात तब्बल ७ हजार ७९८ इतक्या मोठ्या प्रमाणावर मत मिळाली आहेत. त्यामुळे भाजपला या भागात शिरकाव करण्यात आणि पाय रोवण्यात यश मिळाले आहे, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या मतांचा आगामी महापालिका निवडणुकांसाठी देखील भाजपला चांगला फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com