पुढील दहा वर्षांनी राम शिंदेंना कोणी ओळखू शकणार नाही

आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने ( NCP ) आज कर्जतमध्ये शक्तिप्रदर्शन केले.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील चार नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात कर्जत नगरपंचायतीचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने ( NCP ) आज कर्जतमध्ये शक्तिप्रदर्शन केले. No one will be able to recognize them in the next ten years

या शक्तिप्रदर्शना पूर्वी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर झालेल्या सभेला आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड, मधुकर राळेभात, सूर्यकांत मोरे, दत्ता वारे, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, नितीन धांडे, मनिषा सोनमाळी, प्रतिभा भैलुमे, सुनील शेलार, विशाल मेहेत्रे आदी उपस्थित होते.

Rohit Pawar
आमदार रोहित पवारांनी एकाच बाणात केले अनेक पक्षी घायाळ...

आमदार रोहित पवार सभेत म्हणाले, भाजपची कालची ( सोमवार ) सभा सर्वांनी पाहिली, आम्हालाही आश्चर्य वाटले. काल सभा आम्ही घेणार होतो, पण कर्जतमध्ये बाजार असल्याने सभा घेतली नाही. बाजाराच्या दिवशी सभा घेतली तर व्यापाऱ्यांचा दिवस जातो. ग्रामीण भागातून आलेले ग्राहक, शेतकरी, मजूर यांना अडचणी येतील हा विचार केला होता. त्यांना उमेदवार व नेते पाहून लोकांची गर्दी होईल अथवा नाही याची शंका वाटल्याने त्यांनी बाजाराच्या दिवशीच सभा घेतली, असे नाव न घेता आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना टोला लगावला.

आमदार पवार पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या पहिल्याच दिवशी नगरपंचायत हारण्याची भीती त्यांनी मनामध्ये बाळगली आहे. कालच्या सभेतील त्यांची भाषणे ऐकली तर त्यांची भाषणे चला हवा येऊ द्या कार्यक्रमापेक्षा कमी नव्हती. पुढे बसलेल्या लोकांना टाळ्या वाजवायला, मजा करायला मिळाली म्हणजे त्यांचे झाले. त्या लेव्हलला आपण जाणार नाही. चार टाळ्या पडल्या की बरं वाटतं. कुणाची चेष्टा करून विकासाबाबत कोणी बोलत नसेल तर सामान्य कुटुंबातील लोकांना त्यातून काही मिळणार नाही.

Rohit Pawar
राम शिंदे म्हणाले, मागील दोन वर्षांत कर्जतच्या जनतेचा अपेक्षाभंग झाला...

त्यांनी ठामपणे सांगितले की, आपल्याला विकास पाहिजे. विकास काय असतो हे त्यांना कसं कळणार? त्यांनी आतापर्यंत गटातटाचे राजकारण केले. याला फुगवायचं त्याला फुगवायचं मग दोन्हींना आपणच पेटवायचं, असे राजकारण आपल्याकडून होणार नाही. लोकांनी आमदार म्हणून निवडून दिले. लोकांच्या हितासाठी काम करत राहील.

मागील दोन वर्षांत कोरोनाचा काळ होता. देश व राज्य अनेक अडचणींना सामोरे गेले. तरीही कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी भरीव निधी आणला. त्यांच्या काळात ते पाच वर्षे मंत्री होते. मंत्री असताना सुद्धा त्यांनी जेवढा निधी मतदार संघात आणला नाही, त्यापेक्षा जास्त निधी कोरोना काळात अडचणी असतानाही आणला. ते कर्जतमध्ये एसटीचे आगार आणण्यासाठी वाढदिवसांचे मुहुर्त शोधत होते. निवडणुकीच्यावेळी चार खासगी बस आणून बसस्थानकात उभ्या करायचे आणि बस आल्या म्हणून सभांतून सांगायचे. मी विधानसभेच्या वेळी शब्द दिल्या प्रमाणे एसटी आगाराचा प्रश्न सोडविला आहे.

Rohit Pawar
कर्जतमध्ये दोन वर्षांनी पुन्हा राम शिंदे विरुद्ध रोहित पवार सामना

कर्जतमध्ये जुनी नगरपंचायत इमारत आहे. ही इमारत आज पडते की उद्या पडते अश्या धोकादायक स्थितीची आहे. कर्जतमधील सर्व प्रशासकीय कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी निधी आणला. कामे सुरू होणार आहेत. हे पाहून ते इमारत दोन किलोमीटर लांब नेली अशी टीका करतात. पण इमारत जुनी होती. तुम्ही मंत्री होते, त्यावेळी झोपले होते काय? पातळी सोडू नका. तुम्ही स्वराज्य ध्वजा बद्दल बोललात. परत पातळी खाली घेतली तर लोकशाही व जनतेच्या माध्यमातून दाखवून देईल. फक्त दोन वर्षात तुमची ही परिस्थिती झाली. पुढील दहा वर्षांत तुम्हाला कोणी ओळखू शकणार नाही, अशी परिस्थिती लोकनिर्माण करतील, असा इशाराही आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांचे नाव न घेता दिला.

यावेळी रोहित पवार यांनी कर्जतचा वाढीव पाणी प्रश्न दोन महिन्यात सोडविण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक मान्यता मिळाली आहे. शहरातील रस्ते रुंदीकरण करताना छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर गदा आणणार नाही, आदी आश्वासनेही दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com