राजकारणात कोणाला पाणी पाजायचं असेल, तर आपल्याकडं पाणी असावं लागतं

सांगोला तालुक्यातील एकही गाव पाण्यावाचून वंचित राहणार नाही
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama

सांगोला (जि. सोलापूर) : राजकारणी खरे नटसम्राट असतात. त्यांना सर्व प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. त्यांना प्रत्येकाच्या सुख-दुःखात, त्याचबरोबर सामाजिक कामातही सहभागी व्हावे लागते. शिवसेनेमध्ये सामाजिक कामांना नेहमीच प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच आज एक पानटपरीवाला शिवसेनेच्या माध्यमातून मंत्री होतो. राजकारणात कोणाला पाणी पाजायचे असेल, तर आपल्याकडे पाणी असावे लागते. बापू, तुम्ही काळजी करू नका, हा पाणीपुरवठा मंत्री तुमच्या पाठीशी आहे. सांगोला तालुक्यातील एकही गाव पाण्यावाचून वंचित राहणार नाही. तालुक्यातील 81 गावांची पाणीपुरवठा योजना यापुढेही सुरु राहणार असल्याची ग्वाही पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. (No one village in Sangola taluka will be deprived of water: Gulabrao Patil)

शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता. 14 ऑक्टोबर) सांगोला येथे शिवसैनिकांना बैठकीत मार्गदर्शन करताना पाणीपुरवठा मंत्री पाटील बोलत होते. या वेळी मंत्री पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमदार शहाजीबापू पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

पाटील म्हणाले की, तीनही पक्षाच्या लोकांची महाविकास आघाडीची गाडी सध्या सुसाट आहे. ही महाविकास आघाडीचे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल. आज-काल कोणी मंत्री, आमदार, खासदार जास्त बोलू लागला की त्याच्यामागे ईडीची चौकशी लागते. चौकशी करायला काहीच हरकत नाही; परंतु कोणी जास्त मालमत्ता मिळवली, त्या सर्वांचीच चौकशी झाली पाहिजे.

Gulabrao Patil
अजितदादांची विक्रमी कामगिरी : ‘सोमेश्वर’मध्ये राष्ट्रवादीचे सहा जण १६ हजारांच्या फरकाने विजयी

आमदार शहाजी पाटील म्हणाले की, सांगोला तालुक्याची दुष्काळी अशी ओळख होती, ती बदलण्याचे काम सध्या करावे लागत आहे. सांगोला तालुक्यातल्या विविध टेंभू, म्हैसाळ शिरभावी यांसारख्या विविध पाणीपुरवठा योजना शिवसेनेच्याच सहकार्याने पूर्ण झाल्या आहेत. 650 कोटी रुपयांची ‘स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना' लवकरच कार्यान्वीत होणार आहे.

दीपक साळुंखे म्हणाले की, सांगोला तालुक्यात राजकारण करायला वयाच्या मर्यादा नाहीत. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार बनले. परंतु विधानसभेच्या वेळीच सांगोल्यात राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देऊन एकत्र काम केले. त्यामुळे सांगोला येथील महाविकासआघाडी राज्याच्या महाविकास आघाडीअगोदरच झाली आहे.

Gulabrao Patil
‘आदिनाथ’साठी बबनदादांचा मुलगाही मैदानात : बारामती ॲग्रोला अडचण असेल तर आम्ही महिन्यात सुरू करू

या वेळी शिवसेनेचे भाऊसाहेब रुपनर, डी. व्ही. पी ग्रुपचे प्रमुख अभिजीत पाटील, काँग्रेसचे प्रा. पी. सी. झटके, संभाजी शिंदे, रफिक नदाफ, बाबुराव गायकवाड, तानाजी पाटील, शहाजी नलवडे, सूर्यकांत घाडगे, कमरुद्दीन खतीब, गुंडादादा खटकाळे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com