...म्हणून आमच्या बद्दल कितीही कान फुंकले तरी शरद पवार व अजित दादा भीक घालणार नाहीत

मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) व अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्याशी असलेल्या स्नेहबंधाच्या आठवणी सांगितल्या.
...म्हणून आमच्या बद्दल कितीही कान फुंकले तरी शरद पवार व अजित दादा भीक घालणार नाहीत
Madhukarrao Pichad Sarkarnama

अकोले ( जि. अहमदनगर ) - राजूर ( ता. अकोले ) येथे झालेल्या एका स्नेहमेळाव्यात भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) व उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्याशी असलेल्या स्नेहबंधाच्या आठवणी सांगितल्या. त्यामुळे अकोले तालुक्यात नव्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ( No matter how much they hear about us, Sharad Pawar and Ajit Dada will not beg )

मधुकरराव पिचड म्हणाले, गोवारी समाजाला आदिवासी आरक्षण मिळावे म्हणून मोर्चा निघाला त्यात 112 लोक मारले गेले. यावेळी सरकार कोसळेल याची भीती होती. प्रसंगावधान राखून सरकार वाचले पाहिजे म्हणून माझी जबाबदारी नसताना मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. याची जाणीव ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आहे. त्यामुळे तालुक्यातील विरोधकांनी आमच्या बद्दल कितीही कान फुंकले तरी शरद पवार व अजित दादा भीक घालणार नाहीत, याची खात्री मला आहे, असे उद्गार माजी मंत्री मधुकर पिचड यांनी राजूर येथे बोलताना काढले.

Madhukarrao Pichad
वैभव पिचड म्हणाले, कामापेक्षा वैयक्तिक टीका टिपण्णी हाच त्यांचा अजेंडा...

ते पुढे म्हणाले की, आदिवासी समाजाचे स्वतंत्र बजेट केले, पेसा कायदा केला. त्यामुळे तालुक्यातील पाणी योजना, जलाशय झाले. रस्ते, आरोग्य, शिक्षण यासाठी निधी देता आला. मी माझ्या कार्यकाळात जितकी कामे केली त्यापेक्षा विरोधकांनी अधिक कामे करावीत. त्यांची मी पाठ थोपटील मात्र केवळ वैयक्तिक टीका, निंदा नालस्ती करून तुम्ही काय साधणार आहात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

माजी आमदार वैभव पिचड यांनी सांगितले की, सत्ता होती तेव्हा सर्व काही ठीक होते. त्या वेळी महत्वाचे पदे भूषवली मात्र सत्ता गेली पदे जातील या भीतीने काही जण गेले. मात्र काळजी करण्याचे काम नाही सर्वसामान्य, जिवाभावाचे कार्यकर्ते आजही आमच्यासोबत आहेत. या पुढील काळात माणसे पारखून घेऊन राजकारण समाजकारण करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Madhukarrao Pichad
मला या वयात रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका - मधुकरराव पिचड

भाऊसाहेब आभाळे म्हणाले, आम्ही वीस वर्षे विरोधक होतो. त्यावेळी माजी मंत्री पिचड यांनी कधीही विरोधकांना त्रास दिला नाही. विकास प्रश्नावर आमच्याशी चर्चा करून प्रश्न सोडविले. कधी जातीचे राजकारण केले नाही. मात्र त्यांनी ज्यांना पदे दिली, ते स्वार्थासाठी निघून गेले. तरी तालुक्यातील जनता आजही सोबत आहे, असे ही त्यांनी सांगितले.

या स्नेह मेळाव्याला भाजपचे गट नेते जालिंदर वाकचौरे, गिर्जाजी जाधव, सुनील दातीर, यशवंत आभाळे, बाळासाहेब वडजे, मुरलीधर भांगरे, काशिनाथ साबळे, सीताराम भांगरे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in