
Sushilkumar Shinde's Big Announcement: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. शिंदे यांनी यापुढे आपण लोकसभेसह कोणतीही निवडणूक लढविणार नाही असं जाहीर केलं आहे.शिंदे यांनी केलेल्या घोषणेमुळे काँग्रेसहसह राजकीय वर्तुळात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या हस्ते सोलापूर काँग्रेस भवनात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी राजकीय वाटचालीवर भाष्य केलं. शिंदे म्हणाले, यापुढे आपण लोकसभेसह कोणतीही निवडणूक लढवणार नाही. मात्र, काँग्रेस पक्षात सक्रिय राहून काम करणार आहे.
सुशीलकुमार शिंदे यावेळी काँग्रेसच्या भवितव्यावर देखील भाष्य केले. शिंदे म्हणाले, सोनिया गांधी यांच्यासारख्या नेत्या ज्या परदेशी असूनही त्यांनी काँग्रेस पक्ष खंबीरपणे व नेटाने पुढे नेली. काँग्रेस पक्ष कधीही संपणार नाही असं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेसला सत्ता कधी येणार याची काळजी नाही. आणि आत्तापर्यंतच्या काँग्रेसच्या वाटचालीमध्ये तीन ते चार वेळा सत्तांतर झाली आहे. तरीदेखील काँग्रेस पक्ष आजतागायत आपलं अस्तित्व टिकून आहे असेही शिंदे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर शिंदे म्हणाले, सीमावादावर महाराष्ट्रानं स्पष्ट भूमिका घ्यावी. मी मुख्यमंत्री असताना सीमावाद सर्वोच्च न्यायालयात पाठवला होता. पण आता मात्र,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सीमावादावर काहीच बोलत नाहीत.कारण त्यांना आपला सरकारचा आणि मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करायचा आहे.
शिंदे यांची निवडणूक निवृत्तीची दुसर्यांदा घोषणा....
सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापूरच्या राजकारणात तीस वर्षांपासून दबदबा निर्माण केला होता. पण २०१४ साली मोदी लाटेत शरद बनसोडे यांनी लाखभर मतानं सुशीलकुमार शिंदेंचा पराभव केला. त्यानंतर 2019 रोजी आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली होती.मात्र,२०१९ मध्ये काँग्रेसला मजबूत उमेदवार न मिळाल्याने पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदेंनाच लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली. पण पुन्हा त्यांच्या पदरी निराशाच आली. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी शिवाचार्य यांच्यात लढत झाली. बहुजन मतांचा विभाजन झाल्याचा फटका शिंदेंना बसला. आणि त्यांचा पराभवाला सामोरे जावे लागले. आता पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.