'यापुढे भाजपशी कधीही युती करणार नाही'

महाराष्ट्राच्या विधानसभेची नगरपालिका झालेली असून यामुळे लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला वेदना होत आहेत.
Raju shetti
Raju shettiSarkarnama

निमगाव (जि. सोलापूर) : स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा अपवाद वगळता भविष्यात विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाशी कधीही युती करणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी स्पष्ट केले. (No alliance with BJP in future : Raju Shetti)

माळशिरस तालुक्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित बोरकर यांनी निमगाव पाटी-विझोरी (ता. माळशिरस) येथे सुरू केलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, तालुकाध्यक्ष अजित बोरकर, सचिन पाटील, अमरसिंह कदम, विझोरीचे सरपंच पोपट काळे, डाॅ. सचिन शेंडगे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju shetti
निवडणूक अधिकाऱ्यास मारहाण करणे भोवले; काँग्रेसच्या बड्या नेत्यास दोन वर्षांची शिक्षा

राजू शेट्टी म्हणाले की, राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणास चांगले म्हणायचे आणि कोणास वाईट म्हणायचे? कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी शेतकरीहिताचे निर्णय जाणीवपूर्वक घेतले जात नाहीत. बळीराजाला नागवले जात आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची नगरपालिका झालेली असून यामुळे लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला वेदना होत आहेत. आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणाशीही युती न करता स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.

Raju shetti
माझी सुरक्षा काढून घ्यावी : शिवसेनेच्या बंडखोर आमदाराचे ‘एसपीं’ना पत्र

बंद खोलीत तासभर चर्चा

वास्तविक पाहता स्वाभिमानीच्या कार्यालयाचे उद्‌घाटन हे निमित्त होते. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी मोजक्याच कार्यकर्त्यांशी बंद खोलीत तासभर चर्चा केली. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार का? की स्थानिक पदाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देऊन ठराविक जागा लढवणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com