मित्राच्या मुलाच्या घरी स्नेहभोजन घेत नितीन गडकरींनी जपली मैत्री!

आमदार कल्याणशेट्टी यांचे वडील (कै.) पंचप्पा कल्याणशेट्टी आणि नितीन गडकरी यांची मैत्री होती.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

अक्कलकोट : सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावर आलेले केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मित्राचा मुलगा, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांच्या घरी स्नेहभोजन घेत आपले मैत्रीचे बंध आणखी घट केले आहेत. गडकरी यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यासुद्धा होत्या. कल्याणशेट्टी कुटुंबीयांनी औक्षण करत गडकरी दांपत्याचे स्वागत केले. गडकरींनी नुसतीच भेटच दिली नाही, तर आमदार कल्याणशेट्टींनी सुचवलेल्या रस्त्याच्या कामांना मंजुरीही देऊन टाकली. (Nitin Gadkari had lunch at MLA Sachin Kalyanshetti's house)

सोलापूर येथे विविध राष्ट्रीय महामार्ग कामांचे लोकार्पण व भूमिपूजन समारंभाचा कार्यक्रम सोमवारी सोलापुरात होता. तो झाल्यानंतर गडकरी पती-पत्नीने अक्कलकोटचे आमदार आणि मित्राचा मुलगा सचिन कल्याणशेट्टी यांच्या घरी स्नेहभोजन घेण्याचा निर्णय घेतला. आमदार कल्याणशेट्टी यांचे वडील (कै.) पंचप्पा कल्याणशेट्टी आणि नितीन गडकरी यांची मैत्री होती. विविध कार्यक्रम आणि पक्षाचे कार्यक्रम यामुळे वारंवार एकत्र येण्यामुळे कल्याणशेट्टी आणि गडकरी यांच्यात कौटुंबीक संबंध प्रस्थापित झाले होते. गडकरी यांची कल्याणशेट्टी यांच्याकडे कायम ये-जा असायची.

Nitin Gadkari
मुंबईत मराठी माणसांना केंद्राच्या आदेशाने गोळ्या घालणार, असा त्याचा अर्थ! : राऊत संतापले!

(कै.) पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र सचिन हे आमदार झाले. कल्याणशेट्टी यांनी मागणी केलेल्या अक्कलकोट मतदारसंघातील अनेक रस्ते, विकास कामांना कोट्यावधींचा निधी गडकरींनी दिला आहे. गडकरी हे सोलापूरला येत आहेत, असे समजल्यानंतर अक्कलकोट येथेसुद्धा कार्यक्रम घेण्याचे आमदारांचे नियोजन होते. पण, गडकरींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ते शक्य झाले नाही. मात्र, जुन्या स्नेहबंधाची जपणूक करत कल्याणशेट्टी यांच्या घरी स्नेहभोजनास येण्याचे गडकरी यांनी मान्य केले होते.

Nitin Gadkari
नवनीत राणा आरोप : ‘संजय पांडेंनी पुरावा देत फडणवीसांना उघडे पाडले’

त्यानुसार गडकरी यांनी सोमवारी अक्कलकोटमध्ये हजेरी लावत श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. त्यानंतर कल्याणशेट्टी यांच्या ‘पद्मालय’ या निवास स्थानी त्यांचे आगमन झाले. त्या ठिकाणी कल्याणशेट्टी कुटुंबीयांनी नितीन गडकरी आणि त्यांच्या धर्मपत्नी कांचन गडकरी यांचे औक्षण करत स्वागत केले. त्यानंतर गडकरींनी स्नेहभोजन घेत कल्याणशेट्टी कुटुंबीयांप्रती असलेला जिव्हाळा आणखी वृद्धिंगत केला गेला. यावेळी गडकरी यांनी (कै.) पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, आमदार कल्याणशेट्टींना विकासकामांसाठी निधींची कमतरता पडू देणार नसल्याचे गडकरींनी स्पष्ट केले.

Nitin Gadkari
औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या सभेची रणनीती पुण्यात ठरली!

या घरगुती कार्यक्रमास माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, आमदार राम सातपुते, शहाजी पवार आदींसह तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्तही उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com