नितेश राणेंनी केली रोहित पवारांची अॅलेक्साशी तुलना : म्हणाले...

भाजपचे आमदार नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी ट्विटरच्या माध्यमातून आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्यावर टीका केली.
नितेश राणेंनी केली रोहित पवारांची अॅलेक्साशी तुलना : म्हणाले...
Nitesh RaneSarkarnama

अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे राज्य व देशातील घटनांवर आपले विचार सोशल मीडियावर मांडतात. ते दिवसभर करत असलेल्या सामाजिक व राजकीय कामांची माहिती सोशल मीडियावर टाकतात. यावर भाजपचे आमदार नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी ट्विटरच्या माध्यमातून आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्यावर टीका केली. ( Nitesh Rane compares Rohit Pawar with Alexa: said ... )

नितेश राणे यांनी ट्विटरच्या मध्यमातून सांगितले की, अमेझॉनकडे अॅलेक्सा आहे आणि महाराष्ट्राकडे रोहित पवार आहेत. दोघांनाही सगळे माहीत आहे. फक्त अॅलेक्साला स्वीच ऑफ करता येते मात्र रोहित पवारांना नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Nitesh Rane
राज ठाकरेंना विरोध नको, अयोध्येला येऊ द्या!

रोहित पवार हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अगोदर अयोद्धेत जाऊन आले. हा दौरा भाजप नेत्यांना चांगलाच झोंबला आहे. या यात्रेतून रोहित पवारांनी सर्वधर्मिय तीर्थस्थळांना भेटी दिल्या. रोहित पवार यांनी विविध स्थळांना दिलेल्या भेटी, राजकीय मते ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियावर टाकत असतात. यावरून नितेश राणे यांनी रोहित पवार यांची तुलना अॅलेक्साशी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.