Solapur BJP Leader : ‘श्रीकांत देशमुखांनी नांदायला नेले नाही तर आयुष्य संपवणार; मृत्यूला निंबाळकर, चंद्रकांतदादा जबाबदार’

श्रीकांत देशमुख यांनी आपल्यासोबत २७ फेब्रुवारी २०२२ रोजी दोन पंडितांच्या साक्षीने पुण्यात लग्न केले होते. त्याला येत्या २७ फेब्रुवारी रोजी एक वर्षे पूर्ण होत आहे.
BJP Leader Shrikant Deshmukh
BJP Leader Shrikant DeshmukhSarkarnama

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे (BJP) सोलापूरचे (Solapur) माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (shrikant deshmukh) यांचा एका महिलेसोबत बेडरूमधील व्हिडिओ (Video) व्हायरल झाला होता. संबंधित महिलेने आपला श्रीकांत देशमुख यांच्याशी विवाह झाल्याचा दावा केला आहे. येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत श्रीकांत देशमुख यांनी मला नांदायला नेले नाही तर मी माझे आयुष्य संपवणार आहे. माझ्या मरणाला रणजित निंबाळकर, उच्चतंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह देशमुखांचे कुटुंबीय जबाबदार असतील, असेही त्या महिलेने म्हटले आहे. (Nirmala Yadav's suicide threat; Allegation that Chandrakant Patil is responsible for death)

BJP Leader Shrikant Deshmukh
NCP MLA News : मतदारांची इच्छा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करू : राष्ट्रवादीच्या आमदाराचे मोठे विधान

काही महिन्यांपूर्वी श्रीकांत देशमुख यांचा निर्मला यादव यांच्यासोबत व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने देशमुख यांच्याकडून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेतली आहे. मात्र, यादव या देशमुख यांच्याकडून आपल्यावर अन्याय झाल्याचे वारंवार सांगत आहेत. देशमुख यांनी आपल्याला फसविल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले हेाते.

श्रीकांत देशमुख यांनी आपल्यासोबत २७ फेब्रुवारी २०२२ रोजी दोन पंडितांच्या साक्षीने पुण्यात लग्न केले होते. त्याला येत्या २७ फेब्रुवारी रोजी एक वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे २७ फेब्रुवारीपर्यंत देशमुख यांनी आपल्याला नांदायला नेले नाही तर मी माझे आयुष्य संपवणार आहे. माझ्या मृत्यूला भारतीय जनता पक्षाचे नेते रणजित निंबाळकर, मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे जबाबदारी असतील, असे निर्मला यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

BJP Leader Shrikant Deshmukh
Pawar Vs BJP : पवारांनी फडणवीसांचा दावा फेटाळल्यानंतर भाजपच्या बड्या नेत्याने केली आगळी वेगळी मागणी

निर्मला यादव यांची फेसबुक पोस्ट

आमची कुलस्वामिनी तुळजापूर भवानी मातेच्या साक्षीने आमचे लग्न पुण्यामध्ये दोन पंडितांच्या साक्षीने झाले आहे. त्या पंडितांनी सोलापूर पोलिसांना जबाब लिहून दिला आहे की, श्रीकांतचे आणि माझे लग्न स्वतः त्या पंडितांनी लावून दिले आहे. मी सुहासिनीसारखीच मरणार.. माझ्या सुहासिनी लेण्याच्यासमोर कोणतीच ताकद मी मानत नाही. या येत्या २७ फेब्रुवारीला आमच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण होत आहे, जर माझ्या नवऱ्याने स्वत: येऊन या २७ फेब्रुवारीपर्यंत जर मला घरी नांदायला घेऊन नाही गेले, तर मी स्वतः माझे आयुष्य संपवणार आहे. मी एक सुहासिण आहे. माझ्यावरती खोटा हनीट्रॅप, माझी खोटी बदनामी, या सर्व गोष्टीला मदत करणारे रणजीत निंबाळकर आणि चंद्रकांतदादा पाटील आणि श्रीकांत देशमुख यांचा मोठा भाऊ शशिकांत देशमुख आणि श्रीकांतची पहिली बायको हे माझ्या मरणाला जिम्मेदार असतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com