'पडळकरावर बोलणं म्हणजे वेळ वायाला घालण्यासारखं..'

आमदार गोपिचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) व आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्यावर टीका केली होती.
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama

Lanke Vs Padalkar : भाजपचे विधानपरिषद आमदार गोपिचंद पडळकर यांनी काल ( शुक्रवारी ) पारनेर तालुक्यातील एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) व आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्यावर टीका केली होती. या टीकेची सव्याज परतफेड आज आमदार नीलेश लंके यांनी त्यांच्या खास शैलीत केली. श्रीगोंदे तालुक्यातील एका कार्यक्रमानंतर उपस्थित पत्रकारांशी ते बोलत होते.

रावणाची लंका हनुमानाने जाळली होती. लंकेची लंका जाळण्यासाठी येथे बरेच लोक आहेत. लंके हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बरे वाटावे म्हणून माझ्यावर टीका करतात, असे पडळकर म्हणाले होते. यावर आमदार नीलेश लंके यांनी सांगितले की, गोपिचंद पडळकर हा न बोलण्यासारखा विषय आहे. त्या माणसावर बोलणे म्हणजे वेळ वायाला घालण्यासारखे आहे. गोपिचंद पडळकर हे सोडून दिलेलं व्यक्तिमत्त्व आहे, असा आरोप त्यांनी केला.

Nilesh Lanke
Gopichand Padalkar : ... तर लंकेची लंका जाळायला इथं बरीच लोक आहेत

ते पुढे म्हणाले की, काल त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन जनसमुदायापुढे भाषण केले. तो जनसमुदाय म्हणजे शंभर-सव्वाशे लोक होते. तेही बाहेरचे होते. माझ्या मतदारसंघातील केवळ पाच-पंचवीस लोकच उपस्थित होते. ते ज्या समाजाचे नेते म्हणवून घेतात. त्या समाजासाठी त्यांचा काय त्याग आहे हे त्यांनी प्रथम पहावे. आम्ही आमच्या मतदारसंघात प्रत्येक तांडा, प्रत्येक वाडीवर जातो. धनगर बांधवांच्या अडचणी समजून घेतो. फक्त समाजाच्या नावाने राजकारण करण्याचे काम काय म्हणतात ते चंद काम करतात, असा चिमटा त्यांनी काढला.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर बोलले म्हणजे आपण खुप मोठे झालो, असे ते समजतात. मात्र शरद पवार कुठे आणि तो कुठे. त्याची लायकी काय? लायकीत रहायचं. मी एक आमदार असताना केंद्रातील एखाद्या मंत्र्यावर टीका करणे शोभणार आहे का? कोणताही पक्ष असला तरी त्यांनी आपल्या मर्यादा ओलांडू नये. त्यांना तेवढेच काम दिलेले असल्यामुळे ते माझ्या मतदारसंघात येऊन टीका करतात. त्यांनी त्यांच्या मतदार संघात डिपॉझिट राहिले का ते पहावं. आपल्या मतदार संघात पाय ठेवायला जागा आहे का हे पहावं. आणि निघाले माझी लंका जाळायला. मी प्रस्तापिता विरोधात 62 हजार मतांनी निवडून आलो शिवाय लोक वर्गणीतून निवडून आलो, असा टोलाही त्यांनी लगावला.

Nilesh Lanke
नीलेश लंके यांनी विरोधकांचे त्रिफळा उडविण्याचे रचले मनसुबे

त्यावेळी पडळकर कुठे होते..

मला निवडून आणण्यात सर्वसमाजाने सहकार्य केले. ते ज्या समाजातून येतात. त्या समाजातील एकही नेते काल व्यासपीठावर नव्हते. त्यांच्या समाजातील नेते मंडळी माझ्या सोबत राहतात. ते माझ्या कुटुंबातीलच आहेत. त्यांच्याकडे केवळ एकच मिरीट आहे ते म्हणजे पवार साहेबांच्या विरोधात बोलायचं. कोरोना काळात मी हजारो लोकांना जीवनदान देण्याचे काम केले. त्यावेळी हे पडळकर कुठे होते. त्यांचे समाजासाठी योगदान काय? एखाद्या गरिबाच्या झोपडीत जाऊन त्यांची त्यांनी साधी विचारपूस केली का? ते म्हणजे शून्य काम करणारा बोलघेवडा माणूस आहेत.

राजकारणात प्रत्येकाने मर्यादा पाळा

पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. त्यांनी कृषी क्षेत्रात जेवढे काम केले तेवढे कोणीही केलेले नाही. आम्ही नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलत नाही. कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्यावर बोलण्याऐवढी माझ्यात पात्रता नाही. पडळकरांनी विकासावर बोलले पाहिजे. समाजाच्या हितासाठी बोलले पाहिजे. सत्तेच्या माध्यमातून धनगरबांधवांना काय मदत करणार यावर बोलायला हवे होते. राजकारणात प्रत्येकाने मर्यादा पाळल्या पाहिजेत, अशी अपेक्षा आमदार लंके यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com