Nilesh Lanke News Updates, Nilesh Lanke clear traffic News Upadtes, Nilesh Lanke resolves traffic jam
Nilesh Lanke News Updates, Nilesh Lanke clear traffic News Upadtes, Nilesh Lanke resolves traffic jam Sarkarnama

आमदार नीलेश लंकेंनी रस्त्यावर उतरत सोडविली वाहतूक कोंडी

आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी स्वतः वाहतुकीचे नियोजन करत रस्ता मोकळा करून दिला.

पारनेर ( जि. अहमदनगर ) - पुणे व मुंबई सारख्या महानगरांत जाण्यासाठी मराठवाडा व अहमदनगर जिल्ह्यातील लोकांना सुपे ( ता. पारनेर ) येथून जावे लागते. मागील आठवड्यात चार दिवस सुटीचे होते. त्यामुळे गावी गेलेले चाकरमाने पुन्हा मोठ्या शहरांकडे काल ( रविवारी ) परतत होते. त्यामुळे सुपे चौकापासून नगर-पुणे महामार्गावर दुतर्फा सुमारे तीन ते चार किलोमीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक कोंडी सुटत नसल्याने अखेर पारनेरचे आमदार नीलेश लंके सुपे चौकात आले. त्यांनी स्वतः वाहतुकीचे नियोजन करत रस्ता मोकळा करून दिला. ( Nilesh Lanke resolves traffic jam )

काल (ता.17) सुपे परिसरातील वाळवणे येथील श्री भैरवनाथ तसेच शनिवारी (ता. 16 ) जातेगाव येथील भैरवनाथाची यात्रा होती. या दोन्ही यात्रा उत्सव दोन दिवस चालतो. कोरोनामुळे गेली दोन वर्षे यात्रा महोत्सव झाले नाहीत त्यात सलग सुट्या आलेने या वर्षी गर्दीने उच्चाक केला आहे.

Nilesh Lanke News Updates, Nilesh Lanke clear traffic News Upadtes, Nilesh Lanke resolves traffic jam
नीलेश लंके यांनी विरोधकांचे त्रिफळा उडविण्याचे रचले मनसुबे

सलग आलेल्या चार दिवसांच्या सुट्या यामुळे अहमदनगर-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुपे चौकात पारनेर वरून वाळवण्याकडे जाणारे येणारी तसेच अहमदनगर व पुण्याकडे जाणारे वाहने व वाढवणा यात्रेसाठी जाणाऱ्या वाहनांची गर्दी झाल्याने चौकात मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीत पारनेरचे आमदार नीलेश लंके सुद्धा काही काळ अडकले होते. मात्र यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह चौकात उभे राहून पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली. या वेळी त्यांच्या समावेत सचिन पवार, समीर शेख, नंदू सोडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार लंके यांनी सुमारे पंचवीस ते तीस मिनिटे वाहतूक नियोजन करून रस्त्यावरील वाहनांची कोंडी व तुंबलेली गर्दी कमी करण्यास मदत केली. चौकात असलेल्या पोलिसांना या ठिकाणी गर्दी आवरण्यास मोठी अडचण येत होती.

Nilesh Lanke News Updates, Nilesh Lanke clear traffic News Upadtes, Nilesh Lanke resolves traffic jam
नीलेश लंके म्हणाले, ते विद्यार्थी कोरोनामुक्त होईपर्यंत मी त्यांचा पालक...

आमदार लंके त्या ठिकाणी उभे राहिल्यानंतर गर्दी सुरळीत होण्यास मदत झाली. आज दिवसभर अहमदनगर-पुणे महामार्ग वाहनांची एकच गर्दी झाली होती. आज सुद्धा वाळवण्याची यात्रेस मोठ्या प्रमाणावर भाविक गर्दी करतात. ही यात्रा दोन दिवस असते.

वाळवण्याकडे जाणारे त्याचबरोबर परिसरातील आलेले पाहुणे यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी राहणार आहे ही गर्दी आवरण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

Nilesh Lanke News Updates, Nilesh Lanke clear traffic News Upadtes, Nilesh Lanke resolves traffic jam
नीलेश लंके म्हणाले, मी पाकिस्तानातून आलोय का ?

गर्दी सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी सुपे चौकात मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त नेमणे गरजेचे आहे .पोलिसांनी स्वयंसेवकांना मदतीस घेऊन गर्दी सुरळीत करणे गरजेचे आहे कारण पोलिसांवरही परिसरातील अनेक गावच्या यात्रा-जत्रा असल्याने बंदोबस्ताचा ताण येत आहे.

सुपे चौकात मुळातच रस्ता चौपदरी झालाच नाही त्यात रस्त्यावर झालेली अतिक्रमणे याशिवाय हॉटेल व हॉटेल समोर उभे राहिलेली अस्ताव्यस्त वाहने यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com