Nilesh Lanke : ..अन्यथा 7 डिसेंबरपासून उपोषण करणार ; निलेश लंकेंचा इशारा!

Nilesh Lanke : दुरवस्थेविषयी अनेकदा पाठपुरावा करून झाला.
Nilesh Lanke news
Nilesh Lanke newsSarkarnama

अहमदनगर : कोरोनाकाळात उभारलेल्या कोव्हिड सेंटर आणि वेळोवेळी राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमामुळे नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आता आपल्या जिल्ह्यातील रस्त्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत, थेट उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करावी, नाहीतर आपल्याला उपोषण करावे लागेल, अशी आक्रमक भूमिका लंके यांनी घेतली आहे.

Nilesh Lanke news
Gujrat Election 2022 : पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान : 788 उमेदवारांच्या भवितव्याचा होणार फैसला‍!

अहमदनगर जिल्ह्यातील मनमाड - पाथर्डी - सोलापूर या तीनही राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेमुळे अनेकांना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुरावस्थेविषयी अनेकदा पाठपुरावा करून झाला, मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केला.

रस्ते तातडीने दुरूस्त करा अन्यथा 7 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार, असा इशाराही लंकेनी दिला. केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी जेव्हा अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते, त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी गडकरींना चुकीची माहिती दिल्याचा आरोपही लंकेनी केला आहे.

Nilesh Lanke news
kerala Cabinet : राज्यपालांना हटविणार ; मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय ; विधेयक आणणार..

निलेश लंके म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 7 डिसेंबरपासून उपोषण आंदोलनाला सुरूवात करणार, आणि प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाल्याशिवाय उपोषण आंदोलन सोडणार नाही. आतापर्यंत आंदोलनं खूप झाले, रास्ता रोको खूप झाले, अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने पाठपुरावा केला, तरीही काम सुरू झाले नाही. कामाला सुरूवात व्हावी, यासाठीआता आम्ही उपोषणाचे ठोस पाऊल उचलले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com