राज्याचे मंत्रिमंडळ ठरेना; झेडपी अध्यक्षांचे आरक्षण निघेना!.

राज्यातील सुमारे २५ जिल्हा परिषद आणि २८४ पंचायत समित्यांचे गट आणि गणनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. मात्र, या सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण मंत्रीमंडळाचा विस्तार होऊन ग्रामविकास मंत्री नसल्यामुळे होऊ शकलेले नाही.
Solapur ZP
Solapur ZPSarkarnama

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्हा परिषदेच्या (ZP)सभागृहात आगामी काळात कोण दिसणार?, कोणत्या तालुक्‍यातून कोणाची एन्ट्री होणार? या बाबतचे चित्र गटाच्या आरक्षण सोडतीनंतर जवळपास स्पष्ट झाले आहे. सदस्यांचे चित्र स्पष्ट असले तरीही झेडपीचा अध्यक्ष कोण होणार? याबद्दलची उत्सुकता मात्र अद्यापही कायम आहे. झेडपी अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (New faces will be seen in Solapur ZP; But waiting for the president's reservation)

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार स्थिर नसल्याने झेडपी अध्यक्षपदाची आरक्षण सोडत कधी होणार? या बद्दल साशंकता व्यक्त होत आहे. ग्रामविकास मंत्र्यांच्या दालनात झेडपी अध्यक्षपदाची आरक्षण सोडत निघते. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापपर्यंत झाला नसल्याने झेडपी अध्यक्षपदाची आरक्षण सोडत केव्हा होणार? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यातील सुमारे २५ जिल्हा परिषद आणि २८४ पंचायत समित्यांचे गट आणि गणनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. मात्र, या सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण मंत्रीमंडळाचा विस्तार होऊन ग्रामविकास मंत्री नसल्यामुळे होऊ शकलेले नाही. राज्य सरकारची स्थैर्यतेमुळे हा निर्णय अवलंबून असणार आहे.

Solapur ZP
एकनाथ शिंदे बंडाला तयार नव्हते...पण ४० आमदारांनी त्यांना ४ महिने `टाॅर्चर’ केले अन्‌ इतिहास घडला..

सोलापूरसह राज्यातील सर्वच २५ जिल्हा परिषदेच्या आगामी सभागृहात जवळपास सर्वच तालुक्‍यातून नव्या चेहऱ्यांची एन्ट्री होण्याची शक्‍यता आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाला झेडपी अध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत माहिती पाठविण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेले वेगवेगळ्या प्रवार्गाचे अध्यक्ष, जिल्ह्यातील लोकसंख्येची माहिती सादर करण्यात आली आहे. झेडपी अध्यक्षपदाची आरक्षण सोडत झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या रणनीतीला वेग येण्याची शक्‍यता आहे.

Solapur ZP
शहाजीबापू पाटलांचा मोठा गौप्यस्फोट, ‘आम्ही एकनाथ शिंदेंनाही सोडणार होतो...’

आमदार शिंदेंच्या रणनितीचा पॅटर्न

जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्यासाठी २०१७ मध्ये आमदार संजय शिंदे यांनी झेडपी सदस्य निवडणुकीपासून जिल्हाभर आखलेली रणनीतीचा आदर्श पॅटर्न मानला जात आहे. झेडपी सदस्यांच्या निवडणुका होण्यापूर्वी त्यावेळी अध्यक्षपदाची आरक्षण सोडत झाली होती. त्यामुळे समविचारी आघाडीच्या माध्यमातून आमदार शिंदे यांनी झेडपी अध्यक्षपदाचे परफेक्‍ट प्लॅनिंग केले होते. आगामी काळात झेडपीचा अध्यक्ष होणाऱ्याला तशी व्यूहरचना आखण्यासाठी सुरुवातीला झेडपीच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत होणे आवश्‍यक आहे.

Solapur ZP
राष्ट्रवादीला धक्का : परभणीच्या माजी खासदाराचा पक्षाला रामराम; शिंदे गटात जाणार!

अध्यक्षपद ओबीसी की सर्वसाधारण?

सोलापूर जिल्हा परिषदेला २०१७ ते २०२२ या पाच वर्षांत सर्वसाधारण व अनुसूचित जातीचे अध्यक्ष मिळाले. तत्कालिन अध्यक्ष संजय शिंदे यांच्या पूर्वी सर्वसाधारण महिला प्रवर्गातून जयमाला गायकवाड अध्यक्ष होत्या. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा सर्वसाधारण किंवा ओबीसी आरक्षण पडण्याची शक्‍यता आहे. झेडपी अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in