Satara : उद्धव ठाकरेंवर राष्ट्रवादीचा जादूटोणा... चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

२०२४ च्या निवडणूकीत Election काँग्रेस Congress, राष्ट्रवादी NCP आणि उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांच्या शिवसेनेला Shivsena उमेदवार सुद्धा मिळणार नाही.
Udhav Thackeray, Chandrashekhar Bawankule
Udhav Thackeray, Chandrashekhar Bawankulesarkarnama

सातारा : शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अंकित झाले आहेत. सत्ता गेल्यामुळे ते प्रचंड अस्वस्थ आहेत. ठाकरे हे बोल घेवडे असून त्यांच्यावर कोणी जादू केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. पवारांच्या जो नादाला लागतो तो सहजासहजी सुटत नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज साताऱ्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी सकाळी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरूची या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंची शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली.

बावनकुळे म्हणाले, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी संघटनात्मक रचना भाजपने मजबूत करण्याची जोरदार प्रयत्न चालवले आहेत. २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उमेदवार सुद्धा मिळणार नाही.

Udhav Thackeray, Chandrashekhar Bawankule
Udayanraje Bhosale : इंग्लंडमधील भवानी तलवारीबाबत उदयनराजे भोसले म्हणाले..

उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला आहे, तो जादूटोणा करणारा कोण याविषयी पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, जादूटोणा करणार कोण हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे, पवारांच्या ताब्यात आलेला सहजासहजी सुटत नाही. राष्ट्रवादीने जादूटोणा केल्यामुळेच चुकीच्या मार्गाला जाऊन अडीच वर्षानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले.

Udhav Thackeray, Chandrashekhar Bawankule
मशालीने पुन्हा एकदा इतिहास रचला; BMC निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंना बुस्टर!

सध्या ऐतिहासिक चित्रपटांत इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे, या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले, इतिहासाशी कोणी छेडछाड करू नये. सेंसार बोर्डाने लक्ष देऊन चित्रपटाचे अभ्यासपूर्वक परीक्षण करावे आणि मगच त्याला मंजुरी द्यावी.

Udhav Thackeray, Chandrashekhar Bawankule
Aditya thackeray : 'खोके सरकार' म्हंटल्यावर इतकं का झोंबतय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in