`मला हद्दपार करण्याचा प्रयत्न; वेळ आल्यावर व्याजासकट परतफेड करणार`

आमदार शिंदे (Shashikant Shinde) यांच्या इशाऱ्याने खळबळ
Shashikant Shinde
Shashikant Shindesarkarnama

कुडाळ : जिल्हा बँकेची जावली सोसायटीची निवडणूक ही राजा विरूध्द प्रजा अशीच झाली, त्यामुळेच ही निवडणुक जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात गाजली. ज्यांना मी वाढवले तेच मला हद्दपार करायला निघालेत. मात्र, आता तालुक्यात नवी समीकरणे उदयास येणार हे निश्चित आहे. राष्ट्रवादीचे सर्वजण एकत्र येऊन तालुक्यात वज्रमूठ तयार केली आहे. वेळ आल्यावर व्याजासकट त्यांची परतफेड करणार आहे, असा सूचक इशारा आमदार शशीकांत शिंदे यांनी श्री. मानकुमरे व श्री. रांजणे यांना दिला.

आमदार शिंदे म्हणाले, जावली सोसायटीतून जिल्हा बँकेसाठी निवडणुकीला सामोरे जाताना माझे दैवत शरद पवार साहेब, माझे आधारस्तंभ अजितदादा पवार, तसेच जिल्हयातील नेते रामराजे निंबाळकर, मकरंद पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आदी सर्वांनी मनापासून माझ्यासाठी प्रयत्न केले. ही वस्तुस्थिती असून सर्वांचा मी आभारी आहे. या सर्वांनी माझ्यासाठी काल रात्री पर्यंत प्रयत्न केले.

Shashikant Shinde
विजयाची खात्री असल्यानेच अजित पवारांनी जावळीतून लढण्यास सांगितले : ज्ञानदेव रांजणे

मात्र, ते निष्फळ ठरले, मी काही दिवसांसाठी आजारी असल्याने त्या कालावधीत मी थोडा गाफिल राहिलो. म्हणूनच मला निवडणुकीला सामोरे जावे लागले. शिवेंद्रसिंरहाजेंनीही तुम्हाला मदत केली का, या प्रश्नावर ते म्हणाले, त्यांनी मला मदत करण्याचा प्रयत्न केला. पण, दुर्दैवाने त्यांना त्यात यश आले नाही, अशी टिपण्णी त्यांनी जोडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com