राष्ट्रवादीची ताकद कोल्हापूरच्या मेळाव्यात दिसेल : जयंत पाटलांचे सूचक विधान

राज्यात जिथे तीनही पक्षांना एकत्र येण्याची संधी आहे, तिथे आम्ही नक्कीच एकत्र येऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी करण्याला प्रथम प्राधान्य देईल : जयंत पाटील
Hasan Mushrif-Jayant Patil- A. Y. Patil
Hasan Mushrif-Jayant Patil- A. Y. PatilSarkarnama

कोल्हापूर : ‘‘कोणीही उठून ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad Pawar) यांच्या नावे भाष्य करतो. प्रसिद्धी मिळवायची असेल, तर पवारांवर बोला, असे गणित तयार झाले आहे. ज्यांना समाजाचा पाठिंबा नाही, असे लोकच अशी विधाने करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यावर प्रतिक्रिया देत नाही. त्यातील अनेक गोष्टी खऱ्या नसतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती मोठ्या ताकदीने आणि संख्येने उभे आहे, ते उद्याच्या कोल्हापूरच्या सभेतून सर्वांना कळेल,’’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी टीकाकरांना दिला. (NCP's strength will be seen in Kolhapur rally : Jayant Patil)

कोल्हापूर येथे शनिवारी (ता. २३ एप्रिल) होणाऱ्या संकल्प सभेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सभेबाबत माहिती दिली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील या वेळी उपस्थित होते.

Hasan Mushrif-Jayant Patil- A. Y. Patil
राष्ट्रवादीने नेते पळविताच काँग्रेसने मनसेचे पदाधिकारी फोडले!

जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील सर्व मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. या यात्रेचा समारोप उद्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. कोल्हापूरच्या तपोवन मैदानात सायंकाळी पाच वाजता पक्षाचे सर्व नेते, राज्याचे मंत्री, विधिमंडळातील सदस्य तसेच सर्व पदाधिकारी या सभेला उपस्थित राहणार आहेत. राज्यात केलेल्या दौऱ्यानंतर भविष्यकाळातील राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल, पक्षाची रचना याबाबतीत सूतोवाच करण्यात येणार आहे.

Hasan Mushrif-Jayant Patil- A. Y. Patil
'भाजपच्या कपटनीतीचे दोन मोहरे, एक राणा दांपत्य अन्‌ दुसरे राज ठाकरे!'

राज्यात आमचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी परिवार संवाद यात्रा काढण्यात आली होती. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आलेले नैराश्य झटकून त्यांना पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्याचे सामर्थ्य देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला. स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला गेला. याचा महाविकास आघाडीशी कोणताही संबंध नाही. परंतु राज्यात जिथे तीनही पक्षांना एकत्र येण्याची संधी आहे, तिथे आम्ही नक्कीच एकत्र येऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी करण्याला प्रथम प्राधान्य देईल, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com