चिठ्ठीने केला राष्ट्रवादीचा घात; शिवाजीराव महाडिक बँकेवर जाता-जाता राहिले

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागत आहेत.
चिठ्ठीने केला राष्ट्रवादीचा घात; शिवाजीराव महाडिक बँकेवर जाता-जाता राहिले
Satara DCC Banksarkarnama

सातारा : राजकीयदृष्टया संवेदनशील असलेल्या कोरेगाव तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँक (Satara DCC Bank) निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुरस्कृत सहकार पॅनेलमधून सोसायटी मतदारसंघासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक (Shivajirao Mahadik) व आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांच्या गटाच्या सुनील खत्री यांच्यात चुरशीची लढत झाली. मतमोजणीत दोघांनाही प्रत्येकी 45 मतं मिळाली. त्यामुळे अखेर चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये खत्री यांच्या बाजूने कौल आला.

कोरेगाव तालुक्यात सोसायटी मतदारसंघाचे एकूण ९० मतदार होती. त्यातील अनेक सोसायट्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचा दावा केला जात होता. शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचे समथर्कही काही सोसायट्यांवर आहेत. दोन्ही आमदार गटातील कार्यकर्ते विजय आपलाच होणार, असा दावा करत होते. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत ही निवडणूक चुरशीची राहणार असल्याचे चिन्ह होते. राष्ट्रवादीने बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने यांचा पत्ता कट करुन शिवाजीराव महाडिक यांना मैदानात उतरविले होते.

Satara DCC Bank
शेखर गोरेंचा दणकून पराभव; राष्ट्रवादीच्या प्रदीप विधातेंचा मोठा विजय

प्रचारादरम्यान दिसलेली चुरस निवडणूक निकालातही दिसून आली. दोघांना समसमान मतं मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठीद्वारे विजयी उमेदवार घोषित करण्याचा निर्णय घेतला. चिठ्ठीमध्ये खत्री यांच्या बाजून कौल लागल्याने महाडिक यांची निराशा झाली. त्यामुळे राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे.

Satara DCC Bank
पाटणकर ठरले 'जायंट किलर'; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव

दरम्यान, सुनील माने यांनाच उमेदवारी द्यावी, अशी सूचना खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यातील नेत्यांना सुरवातीलाच केली होती. पण, त्यानंतरच्या कालावधीत अनेक राजकीय घडामोडी होऊन पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेलेे. परिणामी, माने यांची उमेदवारी कापण्यात आली. त्याबद्दलची नाराजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह कोरेगाव सोसायटींच्या मतदारांतही आहे. या नाराजीचा फटकाही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Satara DCC Bank
बंडखोर घार्गेंचा अजित पवारांना धक्का; नंदकुमार मोरे यांचा पराभव

आमदार महेश शिंदे यांनी दिवसेंदिवस आपले स्थान घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा फायदा सुनील खत्री यांना झाल्याचे बोलले जात आहे. आमदार शशीकांत शिंदे हे जावळी सोसायटीच्या निवडणुकीत अडकल्याने त्यांना कोरेगावात फारसे लक्ष देता आले नाही. त्याचाही काहीसा परिणाम दिसून आला. कोरेगाव सोसायटी मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचा होता. त्यामुळे सर्वांनी लक्ष घातले तर राष्ट्रवादीला ही निवडणूक अवघड नाही, असे चित्र होते. पण, नाराजांनी या निवडणुकीत बदलाचा सुर आळवला अन् कोरेगावची लढत अटीतटीची झाली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in