शिवसेनेला डावलून राष्ट्रवादीचे भाजप प्रेम; शंभूराज देसाई मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

जिल्हा बॅंकेत DCC bank शिवसेना Shivsena व काँग्रेसला Congress सामावून घेऊन सामंजस्याने एकत्रित निवडणूक करावी, अशी अपेक्षा होती. तसे काही संकेतही राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेत्यांकडून मिळाले होते
Shambhuarj Desai, Udhav Thackeray
Shambhuarj Desai, Udhav ThackeraySakal Design

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी आम्हाला शब्द देऊनही सर्वसमावेशक पॅनेलमध्ये जिल्ह्यातील नेत्यांनी समाविष्ट करून घेतलेले नाही. ही बाब शिवसेनेने गांभीर्याने घेतली असून, आम्ही हे सर्व पक्षप्रमुखांच्या कानावर घालणार आहे; पण जिल्हा बॅंकेत नको त्या पक्षाशी युती करत शिवसेना व काँग्रेसला बाजूला ठेवण्याचे काम राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले आहे; पण आम्ही आमच्या शिवसेनेच्या ताकदीवर जिल्हा बॅंकेत निवडून येऊ. जिंकण्यासाठीच आम्ही जिल्हा बॅंकेच्या रिंगणात उतरलो आहे, असे स्पष्ट मत शिवसेनेचे नेते व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

पाटण सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलचे सत्यजितसिंह पाटणकर विरुद्ध गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई अशी लढत होत आहे. पाटण तालुक्यातील ही पाटणकर व देसाई घराण्यातील पारंपरिक लढत आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी गृहराज्यमंत्री देसाई यांच्याकडून या निवडणुकीबाबतची नेमकी भूमिका जाणून घेतली. गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असून, तीन पक्ष एकत्रित काम करत आहेत. सहकारात राजकारण नसते हे मलाही माहित आहे.

Shambhuarj Desai, Udhav Thackeray
उदयनराजेंचे टेन्शन गेले, शिवेंद्रसिंहराजेंसह सातारा जिल्हा बँकेवर बिनविरोध

सातारा जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादीचे बहुमत आहे; पण शिवसेना व काँग्रेसला सामावून घेऊन सामंजस्याने एकत्रित निवडणूक करावी, अशी अपेक्षा होती. तसे काही संकेतही राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेत्यांकडून मिळाले होते. अर्ज माघार घ्यायच्या एक ते दोन दिवस आधी आम्हाला राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांकडून कसलीही विचारणा झाली नाही, तसेच काँग्रेसच्या नेत्यांशीही चर्चा केलेली नाही.’’ नको त्यांना पॅनेलमध्ये घेऊन काही जागा बिनविरोध केल्या ते कसे चालते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Shambhuarj Desai, Udhav Thackeray
जिल्हा बॅंकेसाठी हमरीतुमरी... तरी पालकमंत्री आणि शंभूराज यांचे बोलणे नाही...

मंत्री देसाई म्हणाले, ‘‘जे दोन पक्ष सरकारमध्ये आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी साधी चर्चा देखील केली नाही किंवा विश्वासातही घेतले नाही. आमच्यासाठी एकही जागा सोडली नाही. त्यामुळे आम्ही आमचे उमेदवार उभे केले आहेत. आमदार महेश शिंदे यांनीही उमेदवार दिला आहे. आम्ही आता पूर्ण ताकदीने आमच्या उमेदवारांच्या विजयासाठी संयुक्त प्रयत्न करत आहोत.’’

Shambhuarj Desai, Udhav Thackeray
कोणी कितीही गर्जना करू देत; जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचेच पॅनेल येणार...

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत जो अनुभव आम्हाला आला. तो लक्षात घेऊन आम्ही हा सर्व प्रकार शिवसेना पक्ष प्रमुखांच्या कानावर घालणार आहे. सध्या त्यांची तब्येत ठिक नाही, त्यामुळे आम्ही थांबलो आहोत. यापुढे जिल्ह्यातील सर्व निवडणुका शिवसेना स्वत:च्या ताकदीवर व चिन्हावर लढणार आहे. राष्ट्रवादीने कितीही डावलले तरी जिल्हा बॅंकेत शिवसेनेचा निश्चित प्रवेश होणार आहे. आमचे बॅंकेत बहुमत नसले, तरी लोकशाही मार्गाने आम्ही सर्व ताकद लावून ही निवडणूक जिंकू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Shambhuarj Desai, Udhav Thackeray
ज्या विश्रामगृहात वाद झाला.. तेथेच रामराजे आणि उदयनराजे भेटले...

शिवसेनेचा संचालक दिसेल

पाटण सोसायटी मतदारसंघाविषयी बोलताना गृहराज्यमंत्री शंभूराज देसार्इ म्हणाले, ‘‘पारंपरिक लढत असली, तरी आम्ही जिंकण्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे. येथे आमची सर्व तयारी केलेली आहे. त्यामुळे आम्ही मोठ्या ताकदीने ही निवडणूक लढून जिल्हा बॅंकेत शिवसेनेचा संचालक दिसेल.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com