राष्ट्रवादीची सरशी : मकरंद पाटील, राजेंद्र राजपुरे, शिवरूपराजे खर्डेकर जिल्हा बँकेवर बिनविरोध

याबाबतची अधिकृत घोषणा अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमधून तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
राष्ट्रवादीची सरशी : मकरंद पाटील, राजेंद्र राजपुरे, शिवरूपराजे खर्डेकर जिल्हा बँकेवर बिनविरोध
Makrand patil, Rajendra Rajpure, Shivrupraje Khardekarsarkarnama

सातारा ः जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी खरेदी विक्री संघ मतदारसंघातून आमदार मकरंद पाटील व महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघातून राजेंद्र राजपुरे तसेच कृषी प्रक्रिया संस्था मतदारसंघातून शिवरूपराजे खर्डेकर यांच्या विरोधात अर्ज दाखल न झाल्याने ते जिल्हा बँकेवर बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमधून तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत सोसायटी मतदारसंघासह इतर मतदारसंघातून सहा जण बिनविरोध झाले होते. यावेळेस मात्र, बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वसमावेश पॅनेल तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली दुसरे पॅनेल झाले आहे. त्यांनी दोन चार जागा वगळता उर्वरित सर्व मतदारसंघात उमेदवारी अर्ज त्यांच्या पॅनेलच्यावतीने भरले आहेत. तसेच माणचे शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनीही आपले तिसरे पॅनेल तयार केले आहे. त्यांनी बहुतांशी जागांवर उमेदवार देऊन त्यांचे अर्ज भरले आहेत. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत असल्याचे अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी चित्र दिसत आहे. पण अर्ज मागे घेतल्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

Makrand patil, Rajendra Rajpure, Shivrupraje Khardekar
कोणी कितीही गर्जना करू देत; जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचेच पॅनेल येणार...

आज अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी खरेदी विक्री मतदारसंघातून आमदार मकरंद पाटील यांच्याविरोधात एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघातून ते बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा मतदारसंघ कै. लक्ष्मणराव पाटील तात्या यांचा असून त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव मकरंद पाटील यांना या जागेवर संचालक म्हणून घेण्यात आले होते. यावेळेस त्यांनी अकरा ठराव केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात आज एकही अर्ज आला नाही.

Makrand patil, Rajendra Rajpure, Shivrupraje Khardekar
दबाव टाकून संचालक झालेल्यांना घरी बसविण्याची वेळ...

तसेच दुसरे कृषी प्रक्रिया मतदारसंघातून कै. दादाराजे खर्डेकर यांचे चिरंजीव शिवरूपराजे खर्डेकर यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहेत. तसेच महाबळेश्वर विकास सेवा सोसायटी मतदार संघातून राजेंद्र राजपुरे यांच्याविरोधातही अर्ज नसल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व समावेशक पॅनेलचे तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.