राष्ट्रवादी काँग्रेस पती, शिवसेना मूक पत्नी तर काँग्रेसला न बोलावलेले वराती...

खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe PatilSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर शहराजवळील विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन येथील एका कार्यक्रमानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी सुरवातीला राष्ट्रीय वयोश्री योजनेचे कौतुक करत असताना महाविकास आघाडीवर टीका केली. यात राष्ट्रवादी काँग्रेसला पती, शिवसेनेला मूक पत्नी तर काँग्रेसला न बोलावलेले वराती अशी उपमा त्यांनी दिली. ( NCP's husband, Shiv Sena's silent wife, while Congress has not been called ... )

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, मी केवळ केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्या बाबतच बोलू शकतो. तेवढीच माझी जबाबदारी आहे. माझ्याकडे दुसरे रस्ते विकास करण्यासाठी निधी नाही. राज्यात आमचे सरकार असते, माझे वडील राज्यात मंत्री असते तर मी तुम्हाला जिल्ह्यातील रस्त्यांचे चित्र वेगळेही दाखवू शकलो असतो. आमची राज्यात सत्ता नाही मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून 10 हजार कोटी रुपयांची कामे अहमदनगर दक्षिण मतदार संघात सुरू आहेत. काही कामे सुरू व्हायचे आहेत. या रस्त्यांच्या कामे वेगात सुरू आहेत. मी रस्त्यांच्या भूमिपूजनाचे नारळ फोडले नाहीत. मात्र प्रत्येक लोकप्रतिनिधीने केलेल्या कामाचे उद्घाटन करण्याची सवय लावली तर जनता जास्त सुखी होईल. भूमिपूजने बंद करावीत आणि उद्घाटने सुरू करावेत. हा आदर्श प्रत्येक लोकप्रतिनिधीने घ्यावा तरच अहमदनगर जिल्हा पुढे जाईल.

Dr. Sujay Vikhe Patil
सुजय विखे पाटील म्हणाले, जनताच ठरवेल कोणाचा कार्यक्रम होईल...

खासदार डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचा संसार असा आहे की, लग्न हे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नवऱ्याच्या भूमिकेत आहे. त्याने काहीही मनमानी करावी त्याला कोणी काही बोलत नाही. शिवसेना ही मूक बायको सारखी आहे. तिला बोलता येत नाही. काँग्रेस हे वराती आहेत. ज्यांना लग्नाची पत्रिका नव्हती मात्र ते न बोलावताच जेवायला गेले आहेत. त्यामुळे त्यांना लाज नाही. त्यांना जेवायला बोलावले नाही तरीही ते ताट सोडेना. त्यांना मारलं, हाकलंल तरी ते खाली बसतील. मात्र फुकटचं जेवायचे सोडणार नाहीत. नवरा मस्त मजा करतोय. मूक बायको बिचारी झालेला त्रास सहन करते आहे. यांनी सवत आणली तर माझे काय? याची तिला चिंता आहे. शेवटी हा संसार आहे.

रोहित पवार यांनी सौताडा रस्त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. यावर ते म्हणाले, घेऊद्या श्रेय. शेवटी आयुष्यभर श्रेयवादाची लढाई चालूच राहणार आहे. आम्ही म्हणतो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावा आणि श्रेय घ्या, असे मीच म्हणतो. हीच राष्ट्रीय वयोश्री योजना पुणे जिल्ह्यात राबविली जाते. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोटो आहे आणि ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. त्यांचा फोटोच नाही. आम्हाला माहिती आहे. तुम्ही आमच्या शिवाय जगू शकत नाही. आमचाच निधी तुम्हाला लागतो. मात्र तेवढी नैतिकता त्यांनी दाखवावी की, मोदींचे हे काम आम्हाला आवडले हे त्यांनी सांगायला हवे.

Dr. Sujay Vikhe Patil
Video: "वाईन विकली तर ते किराणा दुकान मी बंद करेल",डॉ. सुजय विखे पाटील

त्यांनी चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला. बंगले बांधले. ते आता पकडले जायला लागले तर ते भावनिक भाषण करतात. मी त्यांचे भाषण ऐकले, एखाद्या मंत्री कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी काठ्या खाल्ल्या याचा अर्थ त्यांना पकडले जाऊ नये, असा अर्थ होऊ शकत नाही. देशात सत्तेचा वापर जास्त कोणी केला याचे आणिबाणीच्या काळातील जीवंत उदाहरण जनते पाहिले आहे. काश्मीर फाईल्सच्या माध्यमातून कश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय लोकांना पहायला मिळाला. हेही जनते पुढे आले आहे. जे पैसे खाऊन कारखाने बांधले. साखर कारखान्यांचे खासगीकरण केले. बंगले बांधले, गाड्या घेतल्या, संस्था बांधल्या हा गरिबांच्या कराचा पैसा होता. जो गरिबांसाठी वापरला जाऊ शकत होता. आज त्या पैशाचा गैरवापर केला असेल ज्याचे मन साफ असेल त्याने भीती बाळगू नये. शेवटी न्यायालय, पुरावे आहेत. जर एखाद्याने चोरी केलीच नसेल तर त्याने घाबरण्याचे काही कारण नाही.

महाविकास आघाडीचा प्रत्येक जण रोज टिव्हीवर येऊन का बोलतो. टिव्हीवर येऊ नका. कागदोपत्री पुरावे दाखवा. आम्ही स्वच्छ आहोत. कोणता मंत्री कागदपत्रे सादर करू शकत नाही. ईडीची कारवाई होते. त्यांनी चोऱ्या केल्या असतील तर त्यांना धरायचेही नाही असा नियम नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच सांगितले होते. मैं चौकीदार हू. चौकीदारचे काम आहे घर, देश सुरक्षित ठेवण्याचं. चौकीदार या नात्याने ते सर्व चोरांना पकडतील अशी अपेक्षा आम्हाला आहे.

Dr. Sujay Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. सुजय विखे ही कोरोना पॉझिटिव्ह

आमचे माजी खासदार व केंद्रीय मंत्र्यांना देखील अटक महाराष्ट्रातील पोलिस अटक करतात. मुख्यमंत्र्यावर टीका केली म्हणून केंद्रीय मंत्र्याला उचलून नेतात. तो आचारसंहितेचा भंग झाला. आणि तुम्ही दडपशाही केली ते चालते का?

पूर्वी असे राजकारण नव्हते कारण तत्त्वावर सरकारे बनत होती, स्वार्थावर नाही. हे सरकार तत्त्वावर नव्हे तर स्वार्थावर बनले आहे. जनतेचा कौल नाकारून सत्तेवर बसण्याची जी ओढ ही जास्त करून राष्ट्रवादी काँग्रेसला होती. कारण हे सरकार राज्यात झाले नसते तर हे सर्व लोक भाजप अथवा शिवसेनेत दिसले असते. ही भीती त्यांच्या नेत्यांना होती. आम्ही संपू नये. त्यांनी प्रोपर्ट्या संपू नये या दृष्टीने स्वार्थासाठी सत्ता आणली. त्यांनी राजकारणाची वेगळी दिशा केली असेल तर राजकारणाची दिशा आपण बदलणारच, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Dr. Sujay Vikhe Patil
कोविड सेंटरवर फोटो काढणे एवढाच काहींचा उद्योग - खासदार डॉ. सुजय विखे पाटील

राष्ट्रीय वयोश्री योजनेतील सुधारणांसाठी करणार सादरीकरण

राष्ट्रीय वयोश्री योजनेत ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त व मासिक उत्पन्न 15 हजारपेक्षा कमी आहे, अशा लोकांना जीवनावश्यक साहित्य दिले जाते. या योजनेसाठी 10 कोटीचे वार्षिक बजेट केंद्राने केले. 2017साली ही योजना केंद्राने सुरू केली. वर्षभरात एक लाखच लाभार्थी झाले होते. मी जेव्हा योजनेकडे पाहिले तेव्हा मला वाटले एवढी चांगली योजना असताना एवढे कमी लाभार्थी का? आम्ही या योजनेची शिबिरे अहमदनगर जिल्ह्यात घेण्यास सुरवात केली. 22 शिबिरांत 40 हजार लाभार्थी आम्ही केले. आता देशातील 100 कोटी रुपयांचे साहित्य वाटप झाले आहे. त्यातील एकट्या अहमदनगर जिल्ह्यात 40 कोटींचे साहित्य वाटप झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर जिल्हा व खासदार म्हणून माझे कौतुक केले.

या योजनेत काय त्रुटी आहेत व आणखी काय करता येऊ शकते याचे पावरपॉईंट प्रेझेंटेशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर मंगळवारी ( ता. 29 ) करण्यात येईल. यात आधी 40 हजार लाभार्थी का झाले नाहीत, याचे अनुभव मी त्यांच्या समोर मांडणार आहे. या योजनेसाठी बजेट वाढवून मिळाले तर ज्या घटकाकडे कोणीही लक्ष देत नाही. असा घटकही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लाभार्थी ठरेल. या पावरपॉईंट प्रेझेंटेशनमधून बजटमध्ये या योजनेसाठी निधी वाढवून घेण्याचा माझा प्रयत्न राहील. अहमदनगर जिल्ह्यातील गरिबांच्या मुलांना कोचिंग क्लासचे पैसे भरण्यासाठी नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी मोफत सेट-नीट मार्गदर्शन विळदघाट येथे सुरू केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com