मिरजच्या उमेदवाराचा एबी फॉर्म खिशात घेऊन फिरतोय...तयारीला लागा !

गेल्या निवडणुकीत उमेदवार बॅट चिन्ह घेऊन निवडणूक लढल्यामुळे आणि राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह मिळाले नसल्याने ही निवडणूक आपल्या हातातून गेली. परंतु आगामी निवडणूक मात्र सोडायची नाही
मिरजच्या उमेदवाराचा एबी फॉर्म खिशात घेऊन फिरतोय...तयारीला लागा !
Jayant PatilSarkarnama

मिरज (जि. सांगली) : ‘‘मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरातही राष्ट्रवादी काँग्रेसचा (ncp) पाया भक्कम झाला आहे. मिरज विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवाराचा एबी फॉर्म मी खिशात घेऊन फिरतो आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आत्तापासूनच लागा,’’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कार्यकर्त्यांना केले. (NCP's foundation strong in Miraj taluka : Jayant Patil)

राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा आज मिरजमध्ये होती. त्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी वरील आवाहन पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले. ते म्हणाले की मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरातही राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया भक्कम होण्यासाठी मनोज शिंदे (म्हैसाळकर) यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. याचाच अचूक लाभ आगामी विधानसभा निवडणुकीत आपण घेऊ शकतो.

Jayant Patil
राज्यपालांचे ते पत्र खरे; राजभवनात मी २०२० मध्येच पाहिले : काँग्रेस नेत्याचा दावा

गेल्या दोन निवडणुकांमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघात पक्षाला चढत्या क्रमाची मते मिळाली आहेत. गेल्या निवडणुकीत उमेदवार बॅट चिन्ह घेऊन निवडणूक लढल्यामुळे आणि राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह मिळाले नसल्याने ही निवडणूक आपल्या हातातून गेली. परंतु आगामी निवडणूक मात्र सोडायची नाही, असेही सूचक विधान पाटील यांनी केले.

Jayant Patil
राज्यपालांच्या शिफारसपत्रावर भोंडवे म्हणाले, ‘आमचे एकच बॉस...अजितदादा!’

या वेळी जयंत पाटील यांनी मिरज तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक चर्चा करून त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचा पाया मजबूत करण्यासाठी आणखी प्रयत्न करा. मिरज विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवाराचा एबी फॉर्म मी खिशात घेऊन फिरतो आहे, असे सांगितले.

Jayant Patil
इतर पक्षातील नेते संपर्कात; लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार : जयंतरावांचा गौप्यस्फोट

मिरज शहरातील कार्यकर्त्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी याबाबत स्वतंत्रपणे बैठक घेण्याचे जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी जयंत पाटील यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना उपस्थित कार्यकर्त्यांची हजेरीही घेतली आणि या कार्यक्रमास जास्तीत जास्त पदाधिकारी उपस्थित असल्याबद्दल समाधानही व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.