Mohol Bazar Samiti : सोलापूर जिल्ह्यातील एकमेव बिनविरोध झालेल्या मोहोळ बाजार समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे धनाजी गावडे

मोहोळ तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती वर माजी आमदार राजन पाटील यांचे निर्वीवाद वर्चस्व आहे.
Mohol Bazar Samiti Chairman-vice chairman
Mohol Bazar Samiti Chairman-vice chairmanSarkarnama

मोहोळ (जि. सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यात माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समिती ही एकमेव बिनविरोध झाली होती. स्थापनेपासून पाटील कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या मोहोळ बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनाजी सुरेश गावडे, तर उपसभापतीपदी प्रशांत भागवत बचुटे यांनी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (NCP's Dhanaji Gawde as Chairman of Mohol Bazar Samiti)

सहाय्यक निबंधक व्ही. बी. माने यांच्या अध्यक्षतेखाली मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आणि उपसभापती निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. त्यात धनाजी गावडे आणि उपसभापती प्रशांत बचुटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

Mohol Bazar Samiti Chairman-vice chairman
Dudhani Bazar Samiti : म्हेत्रेंच्या गडात प्रथमच भाजपचा सभापती : दुधनी बाजार समितीच्या सभापतिपदी सातलिंगप्पा परमशेट्टी

सोलापूर (Solapur) जिल्ह्यामध्ये एकमेव बिनविरोध झालेल्या मोहोळ तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार (Bazar samiti) समितीवर राष्ट्रवादीचे (NCP) माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांचे निर्वीवाद वर्चस्व आहे. त्यामुळे विविध सहकारी संस्थेमध्ये निष्ठावंत व क्रियाशील कार्यकर्त्याला काम करण्याची संधी देणे या अनगरकर पंरपरेला अनुसरूनच सभापती उपसभापती व संचालकांची निवड करण्यात आली आहे.

Mohol Bazar Samiti Chairman-vice chairman
Karmala News : स्थापनेपासून बागल गटाकडे असलेल्या मकाई कारखान्याची निवडणूक जाहीर : शिंदे-पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

या प्रसंगी नुतन सभापती धनाजी सुरेश गावडे, उपसभापती प्रशांत भागवत बचुटे यांच्यासह सर्व नुतन संचालकांचा माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांच्या हस्ते फेटा बांधुन सत्कार करण्यात आला. नुतन सभापती धनाजी गावडे हे धनगर समाजाचे सावळेश्वर येथील कार्यकर्ते आहेत.

Mohol Bazar Samiti Chairman-vice chairman
Maharashtra Politic's : शिरसाट, गोगावले, कडूंना मंत्रीपद मिळणार की अपात्रतेच्या निर्णयापर्यंत वाट पहावी लागणार..?

उपसभापती वरकुटे प्रशांत बचुटे वरकुटे येथील रहिवासी असुन लोकनेते परिवाराच्या सोशल मिडीयाच्या प्लॅटफार्मवर ते नेहमी सक्रीय असतात. याप्रसंगी मोहोळ सहकारी संस्था चे सहाय्यक निबंधक व्ही. बी.माने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, हनुमंत बप्पा पोटरे, जगन्नाथ कोल्हाळ, दत्तात्रय पवार, शशिकांत पाटील, अनिल कादे गुरुजी, बाळासाहेब पाटील, दत्तात्रय काकडे, कैलास गावडे, सचिव सचिन पाटीलसह सर्व संचालक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in