Karad : राष्ट्रवादीचे कॉंग्रेसमध्ये लवकरच मोठी फाटाफुट होणार : बावनकुळे यांचे भाकित

शिंदे-फडणवीस Shinde-Fadanvis सरकार अनेक वर्षे सत्तेवर राहणार आहे. त्यामुळे आतातरी किमान दहा-वीस वर्षे विरोधी पक्षाचे opposition party चांगले काम करावे.
Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule, Ajit Pawarsarkarnama

कऱ्हाड : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राहिलेले आमदार, खासदार शिंदे गटात जावुन नयेत म्हणुन राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खटाटोप सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नेहमी सत्तेत राहिलेला आहे. त्यामुळे त्यांचे नेते सत्तेशिवाय राहु शकत नाहीत. काही दिवस गेले की राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये मोठी फुटाफुट होणार आहे. अनेक त्यांचे खासदार, आमदार, नेते भाजप आणि शिंदे गटात येतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

बावनकुळे हे कऱ्हाडच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, विरोधक सरकार पडणार असे वारंवार सांगत आहेत. त्यातल्या त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे हे शिंदे-फडणवीस सरकारबद्दल काही ठिकाणी बोलत आहेत. त्यांच्या पक्षाचे राहिलेले आमदार, खासदार शिंदे गटात जावुन नये म्हणुन राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खटाटोप सुरु आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस नेहमी सत्तेत राहिलेला आहे. त्यामुळे त्यांचे नेते सत्तेशिवाय राहु शकत नाही. काही दिवस गेले की राष्ट्रवादीत मोठे फुटाफुट होणार आहे. अनेक त्यांचे खासदार, आमदार, नेते भाजप आणि शिंदे गटात येतील. आमच्याकडे १६४ चे बहुमत आहे. यापुढे जर बहुमत मागीतल तर १८५ चे बहुमत दिसेल.

Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar
Satara : अजितदादांच्या नॉट रिचेबलवर बावनकुळे हसले अन्‌ म्हणाले....

आता विरोधी पक्षांनी चिंता सोडावी, विरोधी पक्षाचे काम करावे. चांगली सधी विरोधी पक्षात काम करायची संधी मिळाली आहे. २०१९ ला ती मिळणार होती. मात्र बेईमानाने सरकार मिळवले. म्हणुन अडीच वर्षे सत्ता मिळाली. शिंदे-फडणवीस सरकार अनेक वर्षे सत्तेवर राहणार आहे. त्यामुळे आतातरी किमान दहा-वीस वर्षे विरोधी पक्षाचे चांगले काम करावे.

Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar
पालघरमधील चार पंचायत समित्यांवर शिवसेना-राष्ट्रवादीची बाजी; भाजप-शिंदे गटाला प्रत्येकी एक समिती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in