लोणंद नगरपंचायतीत राष्ट्रवादी पक्ष चिन्हावर लढणार : मकरंद पाटील

लोणंदची Lonand बाजारपेठ असताना जेवढा विकास व्हायला पाहिजे तेवढा झाला नाही. ही खदखद येथील जनतेत आहे तशी मलाही आहे.
Makrand Patil
Makrand Patilsarkarnama

लोणंद : लोणंद नगरपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वच्या सर्व १७ जागा पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे. मात्र, निवडणुकीत अपेक्षित यश मिळवण्यासाठी केवळ पोपटपंची करून चालणार नाही. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाची निष्ठा बाळगून, पक्ष देईल त्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम करा,'' असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले.

लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील अमृता मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात श्री. पाटील बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, मनोज पवार, दयानंद खरात, डॉ. नितीन सावंत, सचिन शेळके- पाटील, विनोद क्षीरसागर, ॲड. सुभाषराव घाडगे, शिवाजीराव शेळके- पाटील, लक्ष्मणराव शेळके- पाटील, किरण पवार, एन. डी. क्षीरसागर, भरतसाहेब शेळके- पाटील, गाणीभाई कच्छी, शफीभाई इनामदार, नंदाताई गायकवाड, राजूभाई इनामदार, अॅड. गजेंद्र मुसळे, शंकरराव क्षीरसागर, सुनील शेळके, भिकूदादा कुर्णे, विठ्ठल शेळके, कय्युमभाई मुल्ला आदी प्रमुख उपस्थित होते.

Makrand Patil
राष्ट्रवादी काॅंग्रेसने मांडला महाविकास आघाडी सरकारचा लेखाजोखा; पाहा व्हिडिओ

आमदार पाटील म्हणाले, ‘‘राज्यात दोन नंबरची कांद्याची, तसेच जनावरे व शेळी मेंढ्यांची लोणंदची बाजारपेठ असताना जेवढा विकास व्हायला पाहिजे तेवढा झाला नाही. ही खदखद येथील जनतेत आहे तशी मलाही आहे. नगराध्यक्षपद हातात नसेल तर विकासकामांना मर्यादा येतात. पक्षाशी निष्ठा असणाऱ्या लोकमान्य उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. विरोधकांना कधीच कमजोर समजू नये. तसे झाले तर धोका होण्याचा संभव असतो.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com