NCP VS NCP : कबड्डी संघटनांमुळे दोन राष्ट्रवादी नेते आमने-सामने

श्रीरामपूरच्या संघटनेच्या आजीव अध्यक्षपदी अविनाश आदिक यांची तर हौशीचे जिल्हाध्यक्ष आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) आहेत.
NCP
NCP Sarkarnama

अशोक निंबाळकर

NCP VS NCP : संघटनेच्या संलग्नतेवरून कबड्डीत राजकीय राईड सुरू झाली आहे. श्रीरामपूर येथील अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन व जिल्हा हौशी कबड्डी संघटना यांच्यात हे दावे-प्रतिदावे सुरू केले जात आहेत. महाराष्ट्र राज्य संघटनेची आम्हालाच मान्यता असल्याचा दावा दोन्ही संघटना करीत आहे. श्रीरामपूरच्या संघटनेच्या आजीव अध्यक्षपदी अविनाश आदिक यांची तर हौशीचे जिल्हाध्यक्ष आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) आहेत. विशेष म्हणजे दोन्ही गट हे राष्ट्रवादीला मानणारे आहेत. त्यामुळे या राजकीय एंट्रीची क्रीडा वर्तुळात चर्चा सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या आजीव अध्यक्षपदी आदिक यांची निवड झाली. जिल्हा कार्यकारिणीही त्यांनी जाहीर केली. त्यानंतर या वादाला तोंड फुटले आहे. हौशी कबड्डी संघटनेचे बहुतांशी पदाधिकारी नगर शहरातील आहेत. ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांची या संघटनेवर छाप आहे. आता राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके अध्यक्षपदाची धुरा सांभाळीत आहेत. उपाध्यक्ष मुकेश मुळे, जयंत वाघ, बबनराव भुजबळ व कर्जतचे सुभाष तनपुरे यांच्याकडे आहे. प्रा. शशिकांत गाडे यांच्याकडे सेक्रेटरीपद आहे.

NCP
नीलेश लंके प्रतिष्ठानचा पलटवार : कोरोना सेंटरसाठी सरकारचे अनुदान घेतले नाही

अहमदनगर जिल्हा कबड्डी संघटना स्व. गोविंदराव आदिक यांनी १९७८ मध्ये स्थापन केली होती. त्या संघटनेलाच राज्य संघटनेची संलग्नता असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हौशी संघटनेने आपण राज्यासोबत जोडले गेलो आहेत, असा दावा केला आहे. इतक्या दिवसांची संघटना आहे तर त्यांनी स्पर्धा का भरवल्या नाहीत, असा सवाल केला जात आहे. जिल्हा हौशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांतून भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार पंकज शिरसाटसारखे खेळाडू घडले. योगेश चव्हाण, विष्णू उंदरे, शीतल लेंडकर, शुभांगी वाबळे आदी राष्ट्रीय खेळाडू तयार झाले. श्रीरामपूर आणि शेवगाव, कर्जत तालुक्यात कबड्डीची क्रेझ आहे. श्रीरामपूरचा अस्लम आणि शेवगावातून जाधव हे प्रो कबड्डी खेळले आहेत. हौशी संघटनेकडून ग्रामीण खेळाडूंना फार संधी मिळत नसल्याच्यही काही खेळाडूंच्या तक्रारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून स्पर्धाच होत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कारभारावर खेळाडू नाराज आहेत, अशीही कूजबूज ऐकायला मिळते.

NCP
अविनाश आदिक म्हणाले, बाकी समय बलवान हैं...

आदिक साहेबांनी जिल्हा कबड्डी संघटना स्थापन केली होती. हौशी कबड्डी संघटना आमच्यानंतर आली आहे. त्यांचा आक्षेप असेल तर संलग्नतेची कागदपत्रे दाखवावित. आम्ही पूर्वीपासूनच राज्य संघटनेसोबत आहोत.

- अविनाश आदिक, आजीव अध्यक्ष, जिल्हा कबड्डी असोसिएशन

अजितदादा ठरवणार...

हौशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांची अधिकृत प्रतिक्रिया समजू शकली नाही. परंतु हे दोन्ही गट राष्ट्रवादीशी निगडित आहेत. राज्य कबड्डी संघटनेवर अजित पवार अध्यक्ष आहेत. संलग्नतेचा वाद त्यांच्याच कोर्टात जाण्याची शक्यता आहे. काहीजण सांगतात आम्ही समविचारी आहोत. त्यामुळे आम्ही ठरवू, असाही सूर ऐकायला येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com