Rahul Jagtap : आमदारांनी आजारी असल्याचे सोंग चालवलय...

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप ( Rahul Jagtap ) यांनी सरकार व भाजपचे आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांच्यावर सडकून टीका केली.
Nationalists on the streets for guaranteed onion price in Srigonda
Nationalists on the streets for guaranteed onion price in SrigondaSarkarnama

NCP Vs BJP : कांद्याला प्रतिकिलो किमान तीस रुपये दर मिळावा, या मागणीसाठी श्रीगोंद्यात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेसने ढोकराई येथे नगर-दौंड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. कांदा रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप ( Rahul Jagtap ) यांनी सरकार व भाजपचे आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांच्यावर सडकून टीका केली.

जगताप म्हणाले, की तालुक्याच्या आमदारांनी आजारी असल्याचे सोंग चालविले आहे. इतर ठिकाणी भाषणे करणारे आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवीत आहेत. चार दिवसांपासून कांद्याला हमी भाव मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी श्रीगोंदे तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. सध्या विद्यमान आमदारांचे सरकार असल्याने त्यांनी शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे. ते आजारी असले, तरी त्यांनी पत्राद्वारे या उपोषणाला पाठिंबा देत सरकारला विचारणा करायला हवी होती.

Nationalists on the streets for guaranteed onion price in Srigonda
‘कुकडी’च्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा राहुल जगताप

यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, माजी पंचायत समिती सदस्य सुनील जंगले, संजय आनंदकर, ऋषिकेश गायकवाड, रामचंद्र नागवडे, अरविंद कुरुमकर, अजीम जकाते, विजय खेतमाळीस, आकाश भोसले, सोनू कोथिंबिरे, सुदाम नवले, दत्ता शिर्के आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com