शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेऊनच राष्ट्रवादीने टाकले पाऊल...

पॅनेलमधील नावे अंतिम करण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेणार आहेत.
Balasaheb Patil, Ramraje Nimbalkar, Ajit Pawar
Balasaheb Patil, Ramraje Nimbalkar, Ajit Pawarsarkarnama

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसमावेशक पॅनेल करताना महाविकास आघाडीतील घटक पक्षांनाही प्रतिनिधीत्व देण्याबाबत चर्चा झाली. शिवेंद्रसिंहराजेंना सामावून घेऊनच राष्ट्रवादीचे पॅनेल उभे राहणार असून इच्छुक असलेल्या सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल करावेत, अशी सूचना रामराजेंनी दिली. पण, पॅनेलमधील नावे अंतिम करण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेणार आहेत. ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरमध्ये दोन्ही पवारांसोबत जिल्ह्यातील नेत्यांची बैठक होऊन त्यामध्ये पॅनेलमधील उमेदवारांची यादी अंतिम केली जाणार आहे.

Balasaheb Patil, Ramraje Nimbalkar, Ajit Pawar
अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले; आपण कायद्याचे पालन करणारे; निदर्शने कशासाठी ?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पुण्यात झाली. यावेळी सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, शशीकांत शिंदे, विक्रमसिंह पाटणकर तसेच भाजपचे सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईत अचानक दोन बैठका लागल्याने ते बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कोण कोणत्या मतदारसंघातून इच्छुक आहेत, याचा आढावा घेण्यात आला. सोसायटी मतदारसंघ, राखीव मतदारसंघासोबतच संस्था मतदारसंघातील नावांवरही चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत पॅनेल करणार असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसेच भाजप असे सर्वसमावेशक पॅनेल करण्यावर चर्चा झाली. या प्राथमिक बैठकीत सोसायटीतून कोण कोण इच्छुक आहेत, याची माहिती रामराजेंनी घेतली.

Balasaheb Patil, Ramraje Nimbalkar, Ajit Pawar
रामराजे आणि उदयनराजे भेटले.. त्याचीच साताऱ्यात चर्चा ;पाहा व्हिडिओ

तसेच संस्था मतदारसंघातून कोण कोण इच्छुक आहेत, तसेच राखीव जागांबाबतही चर्चा झाली. राष्ट्रवादीचे पॅनेल करताना महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेनेला प्रतिनिधीत्व देण्याबाबत ही चर्चा झाली. तसेच भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचा निर्णय झाला. काही मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त आहे. तेथील निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करावेत. ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची बैठक होणार आहे.

Balasaheb Patil, Ramraje Nimbalkar, Ajit Pawar
उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे समर्थक आमने-सामने; विकास कामांवरून श्रेयवाद रंगला....

या बैठकीत सर्वांशी चर्चा करून शरद पवार हे राष्ट्रवादीतील सर्वसमावेशक पॅनेलमधील उमेदवारांची नावे अंतिम करणार आहेत. शक्यतो निवडणूक बिनविरोध कशी होईल, यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा भर असल्याचे बैठकीतील चर्चेच्या सुरातून स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील इच्छुकांना सामावून घेताना राष्ट्रवादीच्या इच्छुकांची अडचण होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. पाटणमध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना कसे ॲडजेस्ट करणार, काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकरांना समावून घ्यायचे का, याविषयीही चर्चा झाली. त्यामुळे खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीत जास्तीत जास्त जागा बिनविरोध कशा होतील, यावर भर दिला जाणार आहे. ज्या जागांवर वाद असून एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत, त्यांना कसे थांबविले जाणार याची आता उत्सुकता आहे.

Balasaheb Patil, Ramraje Nimbalkar, Ajit Pawar
सहकारमंत्र्यांची जिल्हा बॅंकेतील 'एन्‍ट्री' ॲड. उदयसिंह पाटील रोखणार...

बैठकीत उदयनराजे, गोरेंचा उल्लेखही नाही....

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे यांच्या विषयी कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांच्या नावाचा कोणी नामोल्लेखही केला नाही. खासदार उदयनराजे गृहनिर्माण आणि दुग्ध उत्पादक, प्रक्रिया संस्था मतदारसंघातून तर आमदार जयकुमार गोरे हे माण सोसायटी मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये स्थान मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com