Jayant Patil : जयंत पाटलांना शिंदे-फडणवीसांचा पुन्हा धक्का; दिले थेट चौकशीचे आदेश

Jayant Patil News : जयंत पाटील अडचणीत येण्याची शक्यता
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama

Jayant Patil News : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारने धक्का दिला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश शिंदे-फडणवीस सरकारने दिले आहेत.

या आधी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना अपशब्द वापरल्याच्या कारणावरून जयंत पाटलांना निलंबीत करण्यात आले होते. तर आता जयंत पाटील यांची सत्ता असलेल्या सांगली जिल्हा बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश शिंदे-फडणवीस सरकारने दिले आहेत. त्यामुळे जयंत पाटलांना दुसऱ्यांदा धक्का देण्यात आला असून ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सांगली जिल्हा बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारच्या काळात देण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्या चौकशीला स्थगिती देण्यात आली होती. आता शिंदे-फडणवीस सरकारने याच प्रकरणावरून चौकशी करण्याचे आदेश दिलेत. राज्यात मविआ सरकार असताना मानसिंग नाईक यांना बँकेचं अध्यक्षपद न मिळाल्यामुळे त्यांनी चौकशीची मागणी केली होती.

Jayant Patil
Officer Transfers : सनदी अधिकारी पाटील यांचा झाला तुकाराम मुंडे; साडेचार महिन्यांत झाली तिसऱ्यांदा बदली

मात्र, तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी चौकशीला स्थगिती दिली होती. त्यानंतर पार पडलेल्या निवडणुकीत पुन्हा जयंत पाटील यांची बँकेवर सत्ता आली. यावेळी मानसिंग नाईक यांना बँकेचे अध्यक्षपद देण्यात आले. मात्र आता याच बँकेत गैरव्यवहाराच्या आरोपांवर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत.

दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे जयंत पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com